Tuesday, November 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजState Cabinet Meeting: नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्रांबाबत माहिती देणाऱ्यांना बक्षीस;...

State Cabinet Meeting: नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्रांबाबत माहिती देणाऱ्यांना बक्षीस; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय

मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये फडमवीस सरकारने ४ मोठे निर्णय घेतले. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना जाहीर केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने कोणते ४ निर्णय घेतले हे आपण जाणून घेणार आहोत…

मंत्रिमंडळातील महत्वाचे निर्णय
१) नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना. (गृह विभाग)
२) राज्यातील उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात होऊ घातलेले बदल लक्षात घेऊन सुधारणा करण्यात येणार. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

- Advertisement -

Uddhav Thackeray: “शाहाचं ब्रह्मवाक्य नाही, तर ते…”; उध्दव ठाकरेंची अमित शाहांवर सडकून टीका, म्हणाले, स्वतःचं कर्तृत्व…


३) एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा. पालघर जिल्ह्याचा आता झोन-१ मध्ये समावेश. झोन-४ वर्गवारी रद्द आणि विस्तारीकरण नियमातही बदल. (वस्त्रोद्योग विभाग)
४) पालघर जिल्ह्यासाठी पालघर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुख्य दंडाधिकारी न्यायालयाची स्थापना होणार. सरकारी वकील कार्यालयांसह अनुषांगिक पदांच्या निर्मितीस मंजुरी. (विधि व न्याय विभाग)

ताज्या बातम्या