Wednesday, September 2, 2026
Homeमुख्य बातम्यापरसूल धरण ओव्हर फ्लो

परसूल धरण ओव्हर फ्लो

- Advertisement -

उमराणे | वार्ताहर Umrane

उमराणेसह परिसरातील गावांना पिण्याचे पाणी व शेतीसिंचनासाठी वरदान असलेले परसूल धरण ओव्हर फ्लो झाल्याने उमराणेसह परिसरातील सात ते आठ गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या धरणातील जलसाठ्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
१८८५ साली ब्रिटीश राजवटीत हे परसुल धरण बांधण्यात आले आहे.

सुमारे १५० वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याची शेतीसाठी दोन आवर्तने सोडली जातात. तसेच उमराणेसह परिसरातील दहिवड, रामनगर, खारीफाटा, सांगवी, कुंभार्डे, चिंचवे, गिरणारे, तिसगाव आदी गावांच्या पाणीपुरवठा योजनांना या धरणातूनच पाण्याचा पुरवठा केला जातो. यावर्षी पाऊस उशिरा झाल्याने हे धरण भरण्यास काहीसा विलंब लागला. धरण ओव्हर फ्लो झाल्याने परिसरातील गावांचा पाणीप्रश्न संपुष्टात आला आहे. धरण पुर्णपणे भरल्याने परसुल नदीत सांडव्याव्दारे पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे परिसरातील विहिरीही पुर्नजिवीत होवून खरीप हंगामासह आगामी रब्बी हंगामास याचा लाभ होणार आहे.

यावर्षी उमराणेसह परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने परसूल धरण भरण्याची प्रतिक्षा परिसराला लागून होती. या धरणावर उमराणेसह परिसरातील आठ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असल्याने हे धरण लवकरात लवकर भरणे अपेक्षित असते.

उमराणे परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे नद्या, नाले प्रवाहीत झाले आहेत. हे पाणी परसुल नदीत येत असल्याने परसुल नदीलाही दोनदा पूर आला. यामुळे हे धरण भरण्यास मदत झाली. धरणाच्या लाभक्षेत्रात आता आगामी रब्बी हंगामासाठीही जलसंपदा विभागाकडून दोन आवर्तने सोडण्यात येतील. तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न संपुष्टात आल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : वाघाडीत ‘एमडी’चा साठा उद्ध्वस्त; तीन लाखांचे ...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati वाघाडी परिसरातील (Waghadi Area) वाल्मीक नगर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी दुपारी छापा (Raid) टाकून सुमारे तीन लाख रुपये...