Tuesday, December 3, 2024
Homeनगरपाथर्डीत 400 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाया

पाथर्डीत 400 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाया

अवैधरित्या दारू विकणार्‍या 27 ठिकाणी कारवाई करत सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलिसांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत होऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू केल्या आहेत. 16 ऑक्टोबरपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये असून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या चारशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. अवैधरित्या दारू विकणार्‍या 27 ठिकाणांवर कारवाई करून त्यामध्ये 2 लाख 17 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

- Advertisement -

यामध्ये सुमारे 1 हजार 100 लिटर दारू पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. जुगार खेळणार्‍या सात ठिकाणी छापे टाकून यामध्ये दहा हजार 770 रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. बेकायदा शस्त्र बाळगणार्‍या दोन जणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून शस्त्र जप्त केले आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या पाच व्यक्तींना यापूर्वी तडीपार करण्यात आले असून जिल्हाच्या बाहेर त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. सध्या नऊ व्यक्तींना तडीपार करण्याचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अमली पदार्थांची कारवाई करून 1 लाख 33 हजार 860 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी अवैध दारू विक्री, जुगार, शस्त्र बाळगणे, गुन्हेगारीच्या वृत्तीच्या लोकांवर प्रतिबंधक कारवाई, तडीपारचे प्रस्ताव, अमली पदार्थ बाळगणे अशा विविध स्वरूपांच्या अवैध कृती करून गुन्हे करणार्‍या व्यक्तींवर 12 दिवसांत मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. अजूनही ही कारवाई सुरूच राहणार असून निवडणूक काळात शांततेचा भंग करणार्‍या व्यक्तींवर कठोर कारवाई पोलिसांची असणार आहे असे यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे म्हणाले.

आज शेवटची संधी
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्यासाठी आज मंगळवार (दि.29) अखेरचा दिवस आहे. यामुळे मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. यंदा मतदारसंघात बहुरंगी निवडणूक होण्याची चिन्हे असून यामुळे निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. मतदारसंघात शेवगाव आणि पाथर्डी असे दोन स्वतंत्र तालुके असून दोन्ही तालुक्यांतून वाढलेली इच्छुकांची संख्याही सर्वांसाठी डोकदुखी ठरणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या