येवला | प्रतिनिधी
येवला तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत्या उन्हाबरोबरच पाणी मागणाऱ्या गावांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. तापमानाचा पारा यंदा चाळीशी पार झाल्याने वाढत्या तपमानाने जलस्रोत कोरडे पडले आहेत. उन्हाच्या तीव्र झळाने उत्तर पूर्व भाग होरपळून निघत आहेत. सद्य स्थितीत तालुक्यातील ३६ गावे ४७ वाड्यावस्त्यांना ३३ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
गेल्यावर्षी तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा मार्च चांगला गेला. मात्र वाढत्या उन्हाबरोबरच गावोगाव जलस्रोत कोरडे पडत गेल्याने एप्रिल महिन्याच्या सुरुवाती पासूनच उत्तर पूर्व भागातून पाणी मागणी सुरू झाली. विशेषतः पालखेड कालवा लाभक्षेत्रात नसलेल्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली. राजापूर येथील पाणीपुरवठा योजना तर नावालाच उरली असून, आठवडाभरानंतरही पाणी येत नाही. ममदापूर, देवदरी, खरवंडी या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी शेजारील बंधारे कोरडेठाक झाले. लभाणतांडा येथील विहिरिने तळ गाठल्याने या वस्तीवरील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.
टंचाईग्रस्त ३६ गावे ४७वाड्यावस्त्यांना ३३ टँकरच्या माध्यमातून ५५ खेपाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सध्या केला जात आहे. तालुक्यातील तब्बल ५८ हजार ४४८ लोकसंख्येला टँकरने पाणी पाजले जात आहे. नुकतेच पालखेडचे पाणी आवर्तन देताना जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील २७गावांपैकी तब्बल १६ गावे यंदा वगळली त्यामुळे पाणी मागणाऱ्या गावांतालुक्यातील आहेरवाडी, हडपसावरगाव, चांदगाव, ममदापुर, खरवंडी, देवदरी, अनकाई, वसंतनगर, पांजरवाडी, भुलेगाव, देवठाण, आडसुरेगाव, कोळगाव, वाईबोथी, कोळम खु., कोळम बु., सावरगाव, खामगाव, धामणगाव, राजापुर, पिंपळखुटेबु., पिंपळखुटेरें, पन्हाळसाठे, भायखेडा, नगरसुल, सोमठाण जोश, गवंडगाव, बदापुर, वाघाळे, नायगव्हांण, खैरगव्हाण, रेंडाळे, न्याहारखेडा बु., न्याहारखेडा खुर्द, धनकवाडी, कासारखेडे, तांदुळवाडी या ३६ गावांना सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
तांडा वस्ती, भगतवस्ती, चव्हाणवस्ती गोरखनगर, गोरेवस्ती, जाधववस्ती, वाधवस्ती, बोराडेवस्ती, संभाजी नगर, निलक बस्ती, महालगाव, कोतकर वस्ती, भानगडे वस्ती, जाधव वस्ती, साळवे वस्ती, संभाजीनगर, भगतवस्ती, वाघ वस्ती, चव्हाण वस्ती, मुळबाइघाट, कट के वस्ती, कापसेवस्ती, महादेवनगर, गणेशनगर, मानमोडी, माळवाडी पूर्व, पश्चिम, रावतेवस्ती, शेखवस्ती, फरताळवाडी, पश्चिम, पूर्व डोंगरे वस्ती, मोठामळा, चिखले वाडी, विलास खैरणार वस्ती, दादामळा, सोनवणेवस्ती, पहाडे वस्ती, बारवाचामळा, रानुमाळीमळा, घनामाळीमळा पूर्व पश्चिम, पवार वस्ती चौफुली, धनवटे वस्ती, कुडके वस्ती, निकमवस्ती, अबुमाळीमळा, खोडके वस्ती, सानपवस्ती, बोरसेवस्ती, भगतवस्ती, धुपे वस्ती, कमोदकरवस्ती, तांबडधोड, सामठाण जोश, गवंडगाव, चिचोंडी खु., वाघाळे, नायगव्हाण, खैरगव्हाण, रेंडाळे, न्याहारखेडा खु., न्याहारखेडा बु., धनकवाडी, कासारखेडे, तांदुळवाडी या ४७ वाड्यावस्त्याने टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.





