Monday, August 17, 2026
Homeक्राईमPathardi : पाथर्डीत घरफोडीसह 22 गाढवांची चोरी

Pathardi : पाथर्डीत घरफोडीसह 22 गाढवांची चोरी

निंबोडीत 1.70 लाखांचा ऐवज लंपास || आठ ते नऊ लाखांची गाढवे पळविली

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच निंबोडीत घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज, तर बाजार समितीच्या बैल बाजारातून 22 गाढवे चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही प्रकरणांत पाथर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

- Advertisement -

निंबोडी येथे सोमवारी (दि. 10) पहाटे दोन ते सकाळी सातदरम्यान परशुराम चंद्रकांत म्हस्के (वय 60) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट, दोन सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या दोन समया, अर्धा किलोचे चांदीचे ताट व 45 हजारांची रोकड असा 1 लाख 70 हजारांचा ऐवज लंपास केला. घराचा दरवाजा उघडा असल्याने चोरी झाल्याचे विद्या म्हस्के व शेषनारायण सातपुते यांच्या सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आले. म्हस्के यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बाजार समितीच्या बैल बाजारात चरण्यासाठी सोडलेली राजेंद्र शंकर पवार व प्रेमनाथ संभाजी जाधव यांच्या मालकीची 22 गाढवे 6 ऑगस्टच्या रात्री चोरीला गेली. त्यांची किंमत आठ ते नऊ लाख रुपये आहे. 7 ऑगस्ट रोजी गाढवे गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही तपासले असता आयशर टेम्पोतून किमान तीन जण गाढवे नेताना दिसले. संशयितांनी काळे कपडे परिधान केले होते.

राजेंद्र पवार यांनी 11 ऑगस्ट रोजी पाथर्डी पोलिसांत तक्रार दिली. पवार व जाधव हे केज व परळी परिसरातील वीटभट्ट्यांवर गाढवांद्वारे विटा वाहण्याचे काम करतात. गाढवे चोरीला गेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, नवीन गाढवे खरेदीसाठी आठ ते नऊ लाख रुपये कुठून आणायचे, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. पोलिसांनी चोरीचा तपास करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...