Monday, July 27, 2026
HomeनगरCrime News : पाथर्डी शहरात अल्पवयीन मुलीचे अपहरण; पोलिसांचा तपास सुरू

Crime News : पाथर्डी शहरात अल्पवयीन मुलीचे अपहरण; पोलिसांचा तपास सुरू

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

पाथर्डी शहरातील कोरडगाव रोड परिसरात १७ वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २० ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी बुधवारी आईसोबत बाजारात गेली होती. यावेळी तिने स्टेट बँकेत काही काम असल्याचे सांगून आईपासून वेगळी झाली. मात्र, त्यानंतर ती परतली नाही. मुलगी बराच वेळ घरी परतली नाही, त्यामुळे आईने आजूबाजूच्या परिसरात, नातेवाइकांकडे तसेच परिचितांकडे शोध घेतला. तरीदेखील मुलीचा काहीच मागमूस लागला नाही.

शेवटी मुलीच्या आईने पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच मुलीचा शोध घेण्यासाठी पथक तयार करून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण ही गंभीर घटना मानून पोलिसांनी गुप्त माहितीदारांचा आधार घेतला असून, आरोपीचा लवकरच शोध लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पाथर्डी शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्येही चिंता पसरली आहे.

ताज्या बातम्या

पडताळणीनंतर पोलिसांत रीतसर तक्रार करणार, पेपरफुटीवर MPSC चे स्पष्टीकरण

0
मुंबई । Mumbai NEET आणि इतर राष्ट्रीय परीक्षांमधील घोळ ताजे असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांवरही पेपरफुटीचे गंभीर सावट पसरले आहे. अन्न व औषध...