Sunday, April 5, 2026
HomeनगरAhilyanagar : पेट्रोल पंपाचा इंधन पुरवठा खंडीत

Ahilyanagar : पेट्रोल पंपाचा इंधन पुरवठा खंडीत

150 हून अधिक पंपावर खडखडाट || पुरवठा सुरळीत न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील 400 पेट्रोल पंपापैकी 150 हून अधिक ठिकाणी गुरूवार (दि.26) इंधन पुरवठा करणार्‍या कंपन्यांनी पेट्रोल पंपांना इंधन उपलब्ध करून न दिल्याने त्या ठिकाणी खडखडाट होता. यामुळे दिवसभर नगर शहरासह ग्रामीण भागात नागरिकांची पेट्रोल आणि डिझेलसाठी धावधाव सुरू असल्याचे दिसून आले. दरम्यान, पेट्रोल कंपन्यांकडून डिझेल-पेट्रोलचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील दीडशेहून अधिक पंप बंद झाल्याची माहिती पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात इंधन टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

इराण-इस्त्राइल, अमेरिका युद्धामुळे सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल संपणार अशी अफवा पसरल्याने जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावून गरजेपेक्षा अधिक पेट्रोल, डिझेल भरुन घेतले आहे. यामुळे जिल्ह्यातील चारशेपैकी दीडशेहून अधिक पंपावरील साठा संपल्याने पेट्रोल-डिझेल शिल्लक नाही, असे फलक लावण्याची पंप चालकांवर नामुष्की ओढवली.

दरम्यान, दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांचे टँकर मनमाड येथे तर दक्षिणेतील पंप चालकांचे टँकर अकोळनेर (ता. नगर) येथील इंधन डेपोवर पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी थांबून आहेत. मात्र, या ठिकाणी इंधन शिल्लक असतांनाही पेट्रोल कंपनीच्या वतीने पेट्रोल पंपांना इंधनाचा पुरवठा थांबवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच पेट्रोल पंपचालकांनी इंधन कंपन्यांना आगावू इंधनाचे पैसे अदा केल्याने कपंनी चालकांकडून कोणतेही ठोस कारण न देता पेट्रोल चालकांची अडवणूक करण्यात येवून पेट्रोल आणि डिझेल भरून दिले जात नसल्याने जिल्ह्यात इंधन टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित कंपन्यांनी तातडीने पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल उपलब्ध करून न दिल्यास आज (शुक्रवारी) परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता पेट्रोल पंप चालकांनी व्यक्त केली.

इंधन कंपन्यांकडून लिकिंग
गेल्या काही दिवसांपासून देशातील इंधन कंपन्यांकडून सर्वच पेट्रोल पंप चालकांना अन्य पेट्रोल उत्पादनाचे उप पदार्थ घेण्याची सक्ती करण्यात येत आहे. यात बाजार मिळणारे ऑईल आणि पेट्रोल पंपचालकांना लिकींगव्दारे देण्यात येणारे ऑईल यात मोठी तफावत असल्याने आपला तोटा करून पेट्रोलपंप चालकांनी इंधन कंपनीच्या लिकींगच्या उत्पादन घेण्यास साफ नकार दिला आहे.

दुचाकी चार चाकींना पेट्रोल खरेदीची मर्यादा
पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासणार असल्याच्या अफवांमुळे नागरिक भीतीपोटी वाहनाची टाकी पूर्ण भरुन घेत आहेत. यामुळे नगर शहरासह ग्रामीण भागात पंपचालक मोटारसायकलींना जास्तीतजास्त 200 रुपयांच्या मर्यादेत पेट्रोलची विक्री करण्यात येत आहे. यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. प्रती दुचाकी दोनशे तर प्रती चार चाकी 1 हजारांपर्यंत डिझेल सध्या पंप चालकांकडून ग्राहकांना देण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

राजकारण : आता मात्र हद्द झाली!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक खरातपाठोपाठ पत्रकार रवींद्र एरंडे याच्या लैंगिक शोषणाच्या भानगडी बाहेर आल्याने नाशिकच्या बदनामीत भर पडली आहे. या...