Thursday, May 7, 2026
Homeक्राईमSangamner : व्यापार्‍याचे अपहरण करणारी टोळी पकडली

Sangamner : व्यापार्‍याचे अपहरण करणारी टोळी पकडली

दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसे जप्त

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील व्यापार्‍याचे खंडणीसाठी (Merchant Ransom) अपहरण (Abduction) करुन पसार होणारी उत्तर प्रदेशातील पाच अट्टल गुन्हेगारांची टोळी (Gang of Criminals) सोमवारी (दि.9) रात्री 11 वाजता हिवरगाव पावसा टोलनाका (ता.संगमनेर) येथे संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तालुका पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने कार अडवून पकडली. या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी कट्टे (Gavathi Katte), सहा जिवंत काडतुसे आणि कार असा एकूण 11 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

- Advertisement -

याबाबतचे सविस्तर वृत्त असे, की श्रीरामपूर (Shrirampur) भागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पिंपरी चिंचवड येथील व्यापार्‍याचे खंडणीसाठी अपहरण करुन ती कार (क्र.यूपी.70, एचआर.9272) आळेफाट्याकडून संगमनेरच्या (Sangamner) दिशेने येत असल्याची माहिती संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला दिली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.बापूसाहेब हांडे, पोकॉ. राहुल सारबंदे, सुनील ढाकणे, चालक पोहेकॉ. संतोष फड व पोहेकॉ. शांताराम मालुंजकर यांचे पथक हिवरगाव पावसा (Hiwargaon Pawasa) टोलनाका येथे येणार्‍या संबंधित वाहनाकडे लक्ष ठेवून होते. याचबरोबर तालुक्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनाही याबाबत माहिती देवून खांडगाव फाटा येथे सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे, पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते, पोहेकॉ. सचिन उगले, पोहेकॉ. शांताराम झोडगे यांनी नाकाबंदी केली. तसेच पिंपरी चिंचवड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक (LCB Police) देखील सदर आरोपींचा पाठलाग करत होते.

दरम्यान, सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसर पुणेकडून संगमनेरच्या दिशेने काळ्या रंगाची कार येताना दिसली. सदर गाडी ही हिवरगाव टोलनाका येथे येताच पथकाने अत्यंत शिताफीने अडवली. सदर गाडीची पाहणी केली असता त्यात चंद्रशेखर दीपकचंद्र गौड (वय 34 रा. रायपूर, ता. बारव, जि. प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश), दिलीप मोहनलाल सरोज (वय 28, रा. रायपूर, ता. बारव, जि. प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश), अनिल गिरीधारीलाल सरोज (वय 26, रा. सलीमभदारी, लालगंज, जि. प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश), मुकेशकुमार राममुदर चव्हाण (वय 24, रा. काशिपूर, ता. कुंडा, जि. प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश) आणि एक अल्पवयीन पाचजण मिळून आले.

त्यांची झडती घेतली असता 2 गावठी बनावटीचे कट्टे व 6 जिवंत काडतुसे, 5 मोबाइल, घड्याळ व कार असा एकूण 11 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सर्वांना ताब्यात घेवून पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) पथकाच्या ताब्यात दिले. या कारवाईसाठी टोलनाका व्यवस्थापक व कर्मचार्‍यांनी देखील सहकार्य केले.

ताज्या बातम्या

Shrirampur : निर्मळपिंपरी बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणी श्रीरामपुरातील डॉ. कुटेसह दोन...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळपिंपरी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या गंभीर आणि समाजघातक रॅकेटवर पोलिसांनी मोठा घाव घालत, श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठीत...