Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशPlane Crash : लँडिंगवेळी विमान क्रॅश झाल्याने विमानाचा स्फोट; आतापर्यंत ६७ जणांचा...

Plane Crash : लँडिंगवेळी विमान क्रॅश झाल्याने विमानाचा स्फोट; आतापर्यंत ६७ जणांचा मृत्यू

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

मागील आठवड्यात कझाकस्तानच्या अक्ताऊ विमानतळावर अझरबैजान एअर लाइन्सच्या विमानाचे आपत्कालीन लँडींग करत असताना नियंत्रण सुटून विमान कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दक्षिण कोरियामध्ये (South Korea) आज (रविवारी) १८१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा (Plane) लँडिंगवेळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत रॉयटर्सने या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान धावपट्टीवरून घसरले. यानंतर अवघ्या १० सेकंदात नियंत्रण सुटलेल्या विमानाचा स्फोट झाला.या दुर्घटनेत आतापर्यंत ६७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेतील मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना (Passengers) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या विमानात १८१ जण प्रवास करत होते. त्यापैकी १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. या घटनेमुळे मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा गोंधळ उडाला होता. तसेच विमानाला आग लागल्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवरून घसरल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. तर आगीचे नेमके कारण तपासण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली आहे. या दुर्घटनेवर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मुआन विमानतळावर तातडीने बचाव कार्य करण्याचे आदेश दिले असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...