Wednesday, May 8, 2024
Homeनगरप्रधानमंत्री आवास योजनेच्या फलकावर पंतप्रधानांचाच फोटो नाही

प्रधानमंत्री आवास योजनेच्या फलकावर पंतप्रधानांचाच फोटो नाही

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

देशातील प्रत्येक घटकाला हक्काचे घर देण्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे, त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तळागळातील

- Advertisement -

प्रत्येक घटकाला घर देण्याचे प्रयत्न करीत आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचविण्याचे काम देशभर सुरू असताना कोपरगाव विधानसभा मतदार संघात मात्र या योजनेसाठी केलेल्या आवाहन फलकावर पंतप्रधानांचाच फोटो छापला जात नाही, या प्रकाराचा भारतीय जनता पार्टी निषेध करीत असल्याचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी म्हटले आहे.

देशातील नागरिक बेघर राहू नयेत या उदात्त हेतूने सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतून सर्वांना घरे देण्याच्या योजनेला नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कार्यकाळात खर्‍या अर्थाने गती मिळाली. याचबरोबर देशात अनेक योजनांच्या अंमलबजावणीत प्रत्यक्षात जीवंतपणा आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले आहे, करत आहे.

मुख्यत्वे करून गरिबांना लाभ मिळवून देण्यासाठी कटीबध्द असलेल्या केंद्र सरकारच्या योजनांचा वापर मात्र कोपरगाव विधानसभा मतदार संघात सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी केला जात आहे. हे करीत असताना मात्र पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या फोटोचे वावडे का , असा सवालही रोहोम यांनी केला.

गेल्या वर्षभराच्या कार्यकाळात मतदार संघासाठी कोणत्याही प्रकारचा निधी आणला नाही, केवळ माजी आमदार सौ.कोल्हे यांच्या काळातील मंजूर झालेल्या कामांची पाहणी आणि उद्घाटने करण्यात सध्याचे लोकप्रतिनिधी धन्यता मानत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या