Tuesday, April 29, 2025
Homeनगरपीएम ई- बससाठी चार्जिंग स्टेशन उभारणीचा मार्ग मोकळा

पीएम ई- बससाठी चार्जिंग स्टेशन उभारणीचा मार्ग मोकळा

महावितरणकडून उच्चदाब वाहिनीच्या कामाची निविदा प्रसिध्द

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत देशभरात पीएम ई-बस सेवा योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत नगर शहरासाठी 40 ई-बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिका चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर महावितरणकडून उच्चदाब वाहिनीचे काम करण्यासाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र, एकच निविदा प्राप्त झाल्याने या निविदा प्रक्रियेला सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी, चार्जिंग स्टेशनचे काम लांबणीवरच पडले आहे.

- Advertisement -

पीएम ई-बस सेवा योजनेसाठी केंद्र सरकारने 16 ऑगस्ट 2023 रोजी 20 हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून 169 शहरांना तब्बल 10 हजार ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 20 ते 40 लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 150, 10 ते 20 लाख व 5 ते 10 लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 100 व 5 लाखांच्या आतील लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 50 पर्यंत ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नगर शहराला गरजेनुसार 40 बसेस उपलब्ध होणार आहेत. तसा प्रस्तावही मंजूर झालेला आहे. मात्र त्यासाठी महापालिकेला चार्जिंग स्टेशन उभारावे लागणार आहे.

चार्जिंग स्टेशनसाठी महापालिकेने केडगाव येथील अडीच एकर जागा निश्चित केली आहे. तेथे वीज भार मंजूर झालेला आहे. मात्र, सोनेवाडी सब स्टेशन पासून महापालिकेच्या सबस्टेशन पर्यंत अद्याप विजेचा पुरवठा करणारी उच्चदाब वाहिनी टाकण्यात आलेली नाही. या कामाचा खर्च केंद्र सरकार करणार असून हा निधी थेट महावितरणकडे वर्ग होणार आहे. तसा निर्णय केंद्र सरकारने दिलेला आहे. याबाबत महापालिकेने पाठपुरावा केल्यानंतर महावितरण कडून 1.39 कोटी रूपये खर्चाची निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र, मुदतीत एकच निविदा प्राप्त झाल्याने या निविदा प्रक्रियेला सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू होणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....