Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPM Narendra Modi: 'बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा आम्ही पुर्ण केली'…; औरंगाबादच्या नामांतरावरून...

PM Narendra Modi: ‘बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा आम्ही पुर्ण केली’…; औरंगाबादच्या नामांतरावरून पीएम मोदींचे विरोधकांवर टीकास्र

छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज, गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे सभा होती. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला. ”संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की, छत्रपती संभाजीनगर नाव देण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. एकाबाजुला छत्रपती संभाजी महाराज यांना मानणारे तर दुसऱ्या बाजुला औरंजेबला मानणारे लोक असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. औरंगाबाद शहराच्या नावावरून विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले आमच्या सरकारने बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले, आघाडी सरकार अडीच वर्षे सत्तेत होते, पण काँग्रेसच्या दबावामुळे या लोकांची हिंमत झाली नाही. तर महायुती सरकार सत्तेत येताच या शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे केले. आम्ही तुमची इच्छा पूर्ण केली. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण केली. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर बनल्याने सर्वात जास्त त्रास कोणाला झाला? या काँग्रेस पक्षाला, आघाडीवाल्यांना… ज्यांचे लोक हा निर्णय रद्द करण्यासाठी न्यायालयात गेले होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

सभेत बोलताना मोदी म्हणाले, संभाजीनगरची ही महान भूमी महाराष्ट्राच्या गौरवशाली धरती आहे. संताने काय केले हे सांगणारी भूमी. लहुजी वस्ताद को प्रणाम. महाराष्ट्राची ही निवडणूक नवे सरकार निवडण्याचे काम नाही. एकनाथ शिंदे सरकारला ही धन्यवाद देतो. संभाजीनगर बनविण्याचे दुःख झाले ते कॉग्रेस आणि महाविकास आघाडीला. त्या विरोधात कोर्टात गेले. संभाजीमहाराजांच्या हत्यारांमध्ये आदर्श दिसतो. ते महाराष्ट्र संस्कृतीच्या विरोधात आहेत.

ज्यांना संभाजीनगर नावावर अडचण आहे. त्यांना त्यांची हत्या करणाऱ्यांमध्ये मासीहा दिसतो. महाराष्ट्र अशा लोकांचा स्वीकार करेल का?, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राची ही निवडणूक केवळ नवीन सरकार निवडायची निवडणूक नाही. संभाजी महाराज यांना मानणारे एकीकडे आहेत. तर दुसरीकडे औरंगजेब यांचे गुणगान करणारे लोक आहेत, असेही ते म्हणाले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जनता अनेक दशकांपासून करत होती. मराठी गौरवाशी संबंधित हे कामही भाजपने पूर्ण केले आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या या महान यज्ञासोबतच वारसा जपण्याचे संस्कारही आपले सरकार करत आहे. विठ्ठल भक्तांच्या सोयीसाठी आम्ही पालखी महामार्ग तयार केला आहे, असे पीएम मोदी यांनी यावेळी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या