Wednesday, May 20, 2026
HomeनगरAhilyanagar : 300 गावांतील 27 हजार 602 शेतकर्‍यांना फटका

Ahilyanagar : 300 गावांतील 27 हजार 602 शेतकर्‍यांना फटका

कृषीचा अंतिम अहवाल || मार्च 2026 मध्ये शेतकर्‍यांचे कोट्यवधीचे नुकसान

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मार्च महिन्यांत एकट्या नगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 300 गावांतील 27 हजार 602 शेतकर्‍यांना फटका बसला आहे. या शेतकर्‍यांचे काढणीला आलेल्या पिकांसह चारा पिके, फळबागा, भाजीपाला पिकांचे 14 हजार 349 हेक्टरवर 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल कृषी विभागाकडून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारला सादर करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात मार्च महिन्यांत चार ते पाच दिवस अवकाळीसह गारपीठ व वादळी पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव आणि कोपरगाव तालुके वगळता उर्वरित ठिकाणी बरसला. यात सर्वाधिक गावे ही अकोले तालुक्यातील 110 होती. त्याखालोखाल श्रीरामपूर तालुक्यातील 54, नेवासा 39, राहाता 32 आणि पारनेर तालुक्यातील 23 गावांचा यात समावेश होता. या पावसात सर्वाधिक बाधित शेतकरी देखील अकोले तालुक्यातील होते. या ठिकाणी 9 हजार 534 तर पारनेर तालुक्यातील 4 हजार 869 शेतकर्‍यांना अवकाळी व गारपिटीचा फटका बसला. श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यातील प्रत्येकी दीड हजार शेतकर्‍यांना या अवकाळीचा दणका बसला होता.

या पावसात 29. 69 हेक्टरवरील फळबागांचे, 12 हजार 828 हेक्टरवरील फळपिके सोडून बागायत पिकांचे आणि 1 हजार 491 असे फळबागांचे असे एकूण 27 हजार 602 शेतकर्‍यांचे 14 हजार 349 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. झालेले नुकसान हे 33 टक्क्यांंपेक्षा अधिक असून याबाबतच अहवाल कृषी विभागाकडून अंतिम करण्यात आलेला आहे. तसेच जिल्हा प्रशासनामार्फत नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे.

तालुकनिहाय बाधिक गावे क्षेत्र आणि शेतकरी
अहिल्यानगर 5 गावे, 643 शेतकरी व 498.58 हेक्टर. पारनेर 23 गावे, 4 हजार 869 शेतकरी व 3 हजार 369.7 हेक्टर. पाथर्डी 4 गावे, 160 शेतकरी व 36.8 हेक्टर. कर्जत 4 गावे, 5 शेतकरी व 3.21 हेक्टर. श्रीरामपूर 56 गावे, 1 हजार 912 शेतकरी व 1 हजार 136.75 हेक्टर. राहुरी 8 गावे, 1 हजार 490 शेतकरी व बाधित क्षेत्र 1 हजार 253.40 हेक्टर. नेवासा 39 बाधित गावे 1 हजार 466 शेतकरी व 946.76 हेक्टर. संगमनेर 19 गावे, 5 हजार 599 शेतकरी व 2 हजार 371.92 हेक्टर.अकोले 110 गावे, 9 हजार 534 शेतकरी व 3 हजार 535. 81 हेक्टर, राहाता 32 गावे, 1 हजार 925 शेतकरी व 1 हजार 197.74 हेक्टर असे आहे.

ताज्या बातम्या

नांदगावला पावसाची हजेरी

0
नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon सूर्य आग ओकत असताना सायंकाळी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. बुधवारी सकाळपासूनच कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. आज सकाळ...