Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशPM Modi-Trump Visit: २६/११ हल्ल्यातील मास्टरमाईंडला भारताच्या ताब्यात देण्यास ट्रम्प यांची मंजुरी

PM Modi-Trump Visit: २६/११ हल्ल्यातील मास्टरमाईंडला भारताच्या ताब्यात देण्यास ट्रम्प यांची मंजुरी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मुंबईवर २००८ साली झालेल्या २६/११ हल्ल्याच्या आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दहशतवादी तहव्वुर राणा याला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. त्याला न्यायाचा सामना करावा लागेल असे ट्रम्प म्हणाले. पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर विविध मुद्यांवर चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 4 तास चर्चा झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

तहव्वूर राणाबाबत ट्रम्प काय म्हणाले?
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील महत्त्वाचा आरोपी तहव्वूर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. दहशतवादी धोक्याचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र काम करतील, असे ते म्हणाले. त्याचवेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, २६/११ चा कट रचणाऱ्यांवर २००८ च्या मुंबई हल्ल्याचा कट रचल्याबद्दल भारतीय न्यायालयांमध्ये खटला चालवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

भारताने अमेरिकी एजन्सीसोबत तपशील वाटप केला होता. तिथल्या सत्र न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात या गोष्टी मांडण्यात आल्या. भारताने दिलेले पुरावे अमेरिकी कोर्टाने मान्य केले. भारताने दिलेल्या कागदपत्रात २६/११ हल्ल्यात तहव्वूर राणाच्या भूमिकेची माहिती दिली होती.

२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि सध्या लॉस एंजेलिसमधील तुरुंगात असलेल्या राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने सातत्याने प्रयत्न केले. तो पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी जवळचा संबंध आहे. ज्याला ‘दाऊद गिलानी’ म्हणूनही ओळखले जाते. तो दहशतवादी हल्ल्यांमधील एक प्रमुख सूत्रधार आहे. त्याच्यावर हेडली तसेच लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि पाकिस्तानमधील इतर दहशतवादी गटांना हल्ला घडवून आणण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

“मला वाटत नाही की भारताचे बायडेन प्रशासनाशी चांगले द्विपक्षीय संबंध होते. भारत आणि बायडेन प्रशासनामध्ये अशा काही गोष्टी घडल्या ज्या फारशा योग्य नव्हत्या. आम्ही एका अत्यंत हिंसक व्यक्तीला (तहव्वूर राणा) ताबडतोब भारतात परत पाठवत आहोत. आमच्याकडे अनेक विनंत्या असल्याने अजून बरेच काही काम करायचे बाकी आहे. म्हणूनच आम्ही दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारतासोबत काम करत आहोत. आम्हाला भारताच्या हितासाठी चांगले काम करायचे आहे,” असेही ते म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...