Friday, May 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2026 : बाद फेरीसाठी काँटे की टक्कर! हैदराबादच्या बालेकिल्ल्यात आज पंजाबची...

IPL 2026 : बाद फेरीसाठी काँटे की टक्कर! हैदराबादच्या बालेकिल्ल्यात आज पंजाबची अग्निपरीक्षा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट (IPL 2026) स्पर्धेचा १९ वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून, सध्या स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू आहे. त्यामुळे अंतिम ४ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी सर्व संघ शर्यतीत असून सर्व क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरूध्द सनरायझर्स हैदराबादमध्ये (Sunrisers Hyderabad and Punjab Kings) निर्णायक सामना खेळविण्यात येणार आहे.

- Advertisement -

सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) सोपविण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद असणार आहे. विशेष म्हणजे न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर मैदानावर रंगलेल्या पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ६ गडी राखून विजय संपादन केला होता. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय संपादन करून गुणतालिकेत अव्वलस्थान निश्चित करण्यासाठी पंजाब किंग्ज सज्ज असणार आहे.

तर सनरायझर्स हैदराबाद संघाला सलग ५ सामन्यानंतर (Match) पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पराभवाची परतफेड करण्याची संधी सनरायझर्स हैदराबादकडे असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये २५ सामने खेळले गेले असून, पंजाब किंग्ज १७-८ फरकाने पिछाडीवर आहे. तसेच हैदराबाद येथील श्री राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर १० सामने खेळले गेले असून, पंजाब किंग्जने १ सामना जिंकला आहे.

प्रमुख खेळाडू : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, श्रेयस अय्यर, अर्शदीपसिंग.

ताज्या बातम्या