Monday, September 28, 2026
Homeदेश विदेशPM Narendra Modi: पंजा, कंदीलवाल्या लोकांनी मिळून बिहारच्या अभिमानाला धक्का पोहोचवला; PM...

PM Narendra Modi: पंजा, कंदीलवाल्या लोकांनी मिळून बिहारच्या अभिमानाला धक्का पोहोचवला; PM मोदींचा बिहारमधून काँग्रेस आरजेडीवर हल्लाबोल

बिहार | Bihar
यंदा वर्षाच्या शेवटी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा बिहारच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी सिवान येथे राज्यासाठी पाणी, रेल्वे आणि वीज क्षेत्रासह १० हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि उद्घाटन केले. सिवान जिल्ह्यातील जसौलीमध्ये त्यांची सभा पार पडली. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासोबत त्यांनी रोड शो केला. बिहार समृद्ध झाला तर भारत महाशक्ती होईल, असे मोदींनी व्यासपीठावरून ठामपणे सांगितले.

सिवानमधील रॅलीला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, ‘हे सर्व विकास प्रकल्प बिहारला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातील. आम्ही दाखवून दिले की, गरिबी कमी करता येते. जागतिक बँकदेखील भारताची प्रशंसक बनली आहे.’

- Advertisement -

राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पायाशी ठेवतात आणि मी डॉ. बाबासाहेबांना आपल्या हृदयात ठेवतो, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३५ मिनिटांच्या भाषणात आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसवर तुफान हल्ला चढवला. आरजेडी आणि काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असा आरोपही मोदींनी केला.

पंजा, कंदीलवाल्यांनी बिहारच्या अभिमानाला धक्का पोहोचवला
पंजा आणि कंदीलवाल्या लोकांनी मिळून बिहारच्या अभिमानाला धक्का पोहोचवला आहे. या लोकांनी मिळून राज्याला इतके लुटले की, गरिबी बिहारचे दुर्दैव बनले. अनेक आव्हानांवर मात करुन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणले आहे. आम्ही राज्यासाठी खूप काही केले, करत आहोत आणि पुढेही करत राहू. गेल्या १० वर्षांत बिहारमध्ये ५५ हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते बांधले गेले आहेत. १.५ कोटींहून अधिक घरांना वीज मिळाली आहे. १.५ कोटी लोकांना पाण्याचे कनेक्शन दिले आहे.’

गेल्या दशकभरात २५ कोटी भारतीयांनी गरिबीला पराभूत केले. वर्ल्ड बँकेसारख्या अनेक जागतिक संस्थांनी भारताचे कौतुक केले. त्यात बिहार आणि येथील नितीश सरकारचे मोठे योगदान आहे. यापूर्वी बिहारचे अर्ध्याहून अधिक लोक गरीब होते. मात्र, गेल्या १० वर्षांत बिहारच्या जनतेने स्वतःला गरिबीतून मुक्त केले. काँग्रेस आणि राजदच्या राजवटीत गरिबांना घरे मिळाली नाहीत, उपचार नव्हते, शिक्षण नव्हते, वीज नव्हती, गॅस कनेक्शन नव्हते, नोकऱ्या नव्हत्या. गरिबी हटवण्याचे स्वप्न दाखवून त्यांचे स्वतःचे कुटुंब करोडपती झाले’.

आरजेडीच्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसोबत कसे वर्तन केले हे सगळ्यांनी बघितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागा, असे बॅनर बिहारमध्ये लागले आहेत. हे लोक कधीच माफी मागणार नाहीत. कारण यांच्या मनात दलित, मागासवर्गीयांबद्दल आदर नाही. आरजेडी आणि काँग्रेसने आंबेडकरांचे फोटो पायाशी ठेवले, पण मोदी बाबासाहेबांना हृदयात ठेवतात.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...