Monday, October 14, 2024
Homeदेश विदेशनरेंद्र मोदींचा राजकीय उत्तराधिकारी कोण? पंतप्रधानांनी स्वत:च दिले उत्तर; म्हणाले, "माझा उत्तराधिकारी…"

नरेंद्र मोदींचा राजकीय उत्तराधिकारी कोण? पंतप्रधानांनी स्वत:च दिले उत्तर; म्हणाले, “माझा उत्तराधिकारी…”

नवी दिल्ली | New Delhi

देशासह विविध राज्यांत लोकसभा निवडणुकींची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले आहेत. त्यानंतर आता २५ मे आणि १ जून रोजी उर्वरित टप्प्यातील मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित दोन टप्प्यांतील निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु असून प्रचारादरम्यान राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहे.

- Advertisement -

त्यातच काही दिवसापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करतांना “देशात पुन्हा भाजपचे (BJP) सरकार सत्तेत आले तर दोन महिन्यांनंतर मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि अमित शाह (Amit Shah) यांना पंतप्रधान बनवतील”, असे म्हटले होते. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींनी बिहारमधील (Bihar) महाराजगंज येथे एका सभेला संबोधित करतांना केजरीवाल यांच्या या टीकेला उत्तर देतांना आपला उत्तराधिकारी कोण असेल? याबाबत मोठे भाष्य केले आहे.

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “माझा उत्तराधिकारी कुणीही नसून या देशातील जनताच फक्त माझी उत्तराधिकारी आहे. बिहार ही राजेंद्र प्रसादांची भूमी आहे, पण आरजेडी आणि काँग्रेसने ती वसुलीसाठी बनवली आहे. काँग्रेस पक्ष आज तुकडे तुकडे टोळीला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. येथील काही लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यांना न्यायालयाने (Court) दोषी ठरवले आहे. देशातील जनतेने हे सर्व पाहिले आहे. या आघाडीत तीन गोष्टी सारख्या आहेत. त्या म्हणजे टोकाचा धर्मवाद, जातीवाद आणि कुटुंबवाद. मात्र, या सर्वांना ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर मोठा धक्का बसेल”, असे म्हणत मोदींनी विरोधकांवर टीकास्र सोडले.

पुढे बोलतांना मोदी म्हणाले की, “बिहारमधील आघाडीच्या नेत्यांना राज्यातील सन्मानाची पर्वा नाही. पंजाबमधील काँग्रेस नेते बिहारच्या लोकांबद्दल द्वेषपूर्ण बोलतात. पण बिहारमध्ये आरजेडी काँग्रेससोबत युती करत आहे. पहिल्यांदा त्यांनी येथून उद्योग आणि व्यवसायांचे स्थलांतर केले. आता ते बिहारच्या कष्टकरी सहकाऱ्यांचा अपमान करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे आता या रॅलीत आलेल्या लोकांनी प्रत्येक गावात जाऊन लोकांना सांगावे की आम्ही मोदीजींच्या वतीने आलो आहोत. लोकांना सांगा की पुन्हा एनडीएचे सरकार आल्यास घरे कशी मिळणार. ही घरे घरातील महिला प्रमुखांच्या नावावर असतील. येणारी पाच वर्षे बिहारमध्ये समृद्धी घेऊन येणार आहोत. आमच्या बहिणी आता ड्रोन पायलट होतील. तीन कोटी बहिणींना लखपती दीदी बनवण्याची आमची हमी आहे”, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या