मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर (Mumbai Tour) येणार असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडत आहेत. मोदींच्या उपस्थितीत आज सुरुवातीला भारतीय नौदलाच्या (Indian Navy) जहाजांचे लोकार्पण करण्यात आले. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी, आयएनएस वाघशीर (पाणबुडी) या युद्धनौका आजपासून भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल करण्यात आल्या. यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदींनी या तिन्ही युद्धनौका ‘मेड इन इंडिया’ असल्याचे म्हणत या युद्धनौका बनवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांच्यासह सर्व देशवासियांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारताचा (India) समुद्री वारसा, नौदलाचा गौरवशीला इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी आजचा दिवस मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतात नौदलाला नवीन सामर्थ्य, दूरदृष्टी दिलेली आहे. आज त्यांच्या या पावन भूमीवर २१ व्या शतकातील नौदलाला सशक्त करण्यासाठी एक मोठ पाऊल उचलत आहोत. नौदल सुरक्षा जहाज इंडस्ट्रीमध्ये आपला एक समृद्ध इतिहास आहे. आपल्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आज भारत एक मेजर मेरीटाइम पावर बनत आहे. आज जे प्लॅटफॉर्म प्रदर्शित झाले आहेत, त्यात याची झलक आहे” असे त्यंनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, “भारत ग्लोबल साऊथमध्ये जबाबदार सहकारी म्हणून ओळखला जातो. भारत विस्तारवाद नाही तर विकासवादच्या भावनेतून काम करत आहे. नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.सागरचा अर्थ सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन दि रिजन, असा आहे. मात्र, आपण सागरच्या व्हिजनने पुढे गेलो. जेव्हा आपण जी २० चे यजमानपद स्वीकारले तेव्हा वन अर्थ, वन फ्युचर वन फॅमिलीचा मंत्र आपण दिला. करोनाच्या काळात आपण ‘वन अर्थ वन हेल्थ’हा मंत्र दिला,आपण संपूर्ण जगाला आपले कुटुंब मानतो. आपण सबका साथ सबका विकासचा सिद्धांत पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे या क्षेत्राचे संरक्षण करणे भारत (India) आपले दायित्व समजतो” असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
युद्धनौकांचे प्रक्षेपण ऐतिहासिक
रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, युद्धनौकांचे प्रक्षेपण ऐतिहासिक नक्कीच आहे. केवळ भारतीय नौदलाचाच नव्हेतर हिंदी महासागर क्षेत्रात भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावा नक्कीच आहे. तसेच भौगोलिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून हिंद महासागर प्रदेश नेहमीच महत्त्वाचा असला तरीही आजच्या वेगाने बदलणाऱ्या वातावरणात तो आणखी महत्त्वाचा नक्कीच बनला आहे.