नवी दिल्ली | New Delhi
देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी शनिवार (दि.०१ फेब्रुवारी) रोजी संसदेत सदर केला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात (Budget) विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या. संसदेचे अधिवेशन सुरु होण्याअगोदर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी भाषण केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेत विविध पक्षाच्या खासदारांनी आपली मते मांडली. यावर काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीनी (Rahul Gandhi) भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपावर (BJP) विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला. यानंतर आज पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले भाषण केले. यावेळी त्यांनी काँग्रेसह विरोधकांवर जोरदार प्रहार केल्याचे दिसून आले.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की,” राष्ट्रपतींनी (President) केलेले भाषण हे देशाच्या विकासाला गती देणारे भाषण होते. त्यावर कुणी टीका केली, कुणी त्याची प्रशंसा करणं जी बाब स्वाभाविक आहे. पाच दशके आपण गरिबी हटाओच्या घोषणा ऐकल्या आहेत. पण २५ कोटी गरीब हे दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत ते मागच्या दहा वर्षांत झाले आहे. त्यासाठी योजनाबद्ध गोष्टी कराव्या लागतात. आम्ही देशाला खरा विकास दिला असून मातीशी नाळ जोडलेले मातीत आपले आयुष्य घालवतात, तेव्हा बदल होतो”, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
पुढे ते म्हणाले की,” एखाद्या महिलेला (Woman) उघड्यावर नैसर्गिक विधी करायला जावं लागत होतं, त्या महिलेचं दुःख, वेदना काय? ते अनेकांना कळणार नाही. आम्ही १२ कोटींहून अधिक शौचालये बांधून बहिणींचे, मुलींची ही समस्या सोडवली. आजकाल सोशल मीडियावर चर्चा होत आहे की काही नेत्यांचा फोकस जकुजी, स्टायलीश शॉवर्सवर असतो, आमचा फोकस तो नाही आमचा फोकस प्रत्येक घरात पाणी पोहचवण्यावर आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्षे झाल्यानंतरही १६ कोटी घरांमध्ये नळाची जोडणी नव्हती. आमच्या सरकारने १२ कोटी घरांमध्ये नळ जोडणी केली.
आम्ही गरीबांसाठी जे काही काम केले ते राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात विस्ताराने सांगितले”, असेही
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी म्हटले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी सभागृहात एक जुना किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले की, “आपल्या देशात एक पंतप्रधान होते. त्यांना मिस्टर क्लीन बोलण्याची फॅशन झाली होती. ते पंतप्रधान म्हणाले होते की, दिल्लीतून एक रुपया निघायचा, गावापर्यंत त्यातील १५ पैसे पोहोचायचे. आता त्यावेळी तर पंचायतपासून संसदेपर्यंत एकाच पक्षाचे राज्य होते आणि ते पंतप्रधान जाहीरपणे म्हणाले होते की दिल्लीतून एक रुपया बाहेर निघतो, गावात पंधरा पैसे पोहोचतात. खूपच गजब हातसफाई होती. पंधरा पैसे कुणाकडे जायचे हे देशातील सर्वसामान्य माणूसही सहज सांगू शकत होता. आता देशाने आम्हाला संधी दिली आम्ही समस्यांवर उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. बचतही करायची आणि विकासही करायचा हे आमचे मॉडेल आहे. जनतेचा निधी जनतेसाठी वापरला आहे”, असेही त्यांनी सांगितले.
सरकारी ऑफिसमधील रद्दी विकून २३०० कोटी मिळाले
यावेळी मोदी म्हणाले की,”भारतात ज्यांचा जन्मदेखील झालेला नाही, असे १० कोटी लोक सरकारी योजनांचा फायदा घेत होते. आम्ही त्यांची नावं वगळली. खऱ्या लाभार्थ्यांना शोधून काढलं आणि त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवला. त्यामुळे ३ लाख कोटी रुपये चुकीच्या हातांमध्ये गेले नाहीत. तो हात कोणाचा होता, ते आता सांगत नाहीत. सरकारकडून केल्या जाणाऱ्या खरेदीत आम्ही तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला. जॅम पोर्टलवरुन झालेल्या खरेदीमुळे सरकारचे १ लाख १५ हजार कोटी रुपयांची बचत झाली. आमच्या स्वच्छता अभियानाची चेष्टा करण्यात आली. पण आम्ही करत राहिलो. सरकारी कार्यालयांमधील रद्दी विकून २३०० कोटी रुपये मिळाले. आम्ही जनतेसाठी पै पै वाचले आणि कल्याणकारी योजनांमधून ते जनतेपर्यंत पोहोचवले”, असेही त्यांनी म्हटले.