Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशMahaKumbh Mela Stampede : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर PM मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन

MahaKumbh Mela Stampede : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर PM मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन

दिले 'हे' महत्वाचे निर्देश

नवी दिल्ली | New Delhi

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये (Prayagraj) सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात (Mahakumbh Mela) (दि.२९) रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अमृत स्नानादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.महाकुंभातील संगमवर असलेले एक बॅरिअर तुटल्याने ही चेंगराचेंगरी झाल्याचे बोलले जात असून आतापर्यंत या चेंगराचेंगरीत १७ भाविकांचा (Devotees) मृत्यू झाला आहे. तर ६० हून अधिक भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयाच उपचार सुरू आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेनंतर पीएम मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून काही निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्याशी फोनवरून महाकुंभमेळ्यातील परिस्थितीबद्दल चर्चा केली. तसेच कुंभमेळ्यातील घडामोडींचा आढावा घेतला आणि तातडीने मदत व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी देखील मुख्यमंत्री योगी यांच्याशी फोनवरून चर्चा करत या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच सर्व प्रकारची वैद्यकीय मदत करण्याचे आश्वासनही दिले.

प्रयागराजमधील सर्व रुग्णालयांना हायअलर्ट

महाकुंभमेळ्यातील दुर्घटनेनंतर जखमींना महाकुंभात बांधलेल्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले आहे. तसेच सर्व जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम रुग्णालयात उपस्थित आहेत. याशिवाय प्रयागराजमधील सर्व रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून सर्व डॉक्टरांना रुग्णालयांमध्ये पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दुर्घटनेमुळे आम्ही दु:खी – महंत रवींद्र पुरी

प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, “घडलेल्या घटनेने आम्हाला खूप दु:ख झाले आहे, आमच्यासोबत हजारो भाविक होते. या दुर्घटनेनंतर आज आखाडे स्नानात सहभागी होणार नाहीत, असा निर्णय आम्ही जनहितार्थ घेतला आहे. मी लोकांना आवाहन करतो की आजच्या ऐवजी वसंत पंचमीला आंघोळीसाठी यावे. अनेक भाविकांना संगम घाटावर पोहोचायचे होते, त्यामुळे ही दुर्घटना घडली. मात्र आता भाविकांनी पवित्र गंगा जेथे दिसेल तेथे स्नान करावे,” असे त्यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...