Friday, April 25, 2025
Homeक्राईमसराफ दुकानावरील दरोड्याने कोपरगाव हादरले !

सराफ दुकानावरील दरोड्याने कोपरगाव हादरले !

ग्रामस्थांनी धाडस करत दरोडेखोरांना पकडले

घारी |वार्ताहर| Ghari

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील पोहेगाव (Pohegav) येथे दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी सहाचे सुमारास तीन चोरांनी माळवे सराफ या सोन्याच्या दुकानावर (Saraf Shop) दरोडा (Robbery) टाकून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सावधानतेमुळे त्यांचा प्लॅन फसला व नागरिकांनी त्यांना पकडून चोप दिला.

- Advertisement -

सोमवारी सायंकाळी सहा वाजता रस्त्यावरून तीन तलवारधारी तरुणांनी नागरिकांना तलवारी (Swords) दाखवत दहशत निर्माण करून माळवे सराफ यांच्या दुकानात प्रवेश केला. दुकानात असलेल्या माळवे यांच्या पत्नीला तलवारीचा (Swords) धाक दाखवत दुकानातील सर्व ऐवज त्यांनी एका खोक्यात भरला. व पळून जाण्याच्या तयारीत असतानाच माळवे यांनी एका चोराला पकडून ठेवले.

त्यातच आजूबाजूच्या नागरिकांनी दगड मारायला सुरुवात केल्यामुळे दुसरा चोर (Thief) पकडलेला चोराला सोडवण्यासाठी गेला व त्यांनी माळवे यांच्यावर तलवार उगारून त्याची सोडवणूक केली. तेथून ते घेतलेला सर्व ऐवज सोडून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले व त्यांना बेदम चोप दिला. या घटनेमुळेे व्यापार्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...