Saturday, September 12, 2026
HomeनगरAhilyanagar : सभापती शिंदे यांच्या दौर्‍यादरम्यान बंदोबस्तात कसुरी

Ahilyanagar : सभापती शिंदे यांच्या दौर्‍यादरम्यान बंदोबस्तात कसुरी

पोलीस अंमलदार निलंबित || एसपींचा तडकाफडकी निर्णय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अहिल्यानगर जिल्हा दौर्‍यादरम्यान सुरक्षेच्या व्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळल्याने येथील जिल्हा विशेष शाखेतील पोलीस अंमलदार भगवान वाघुले यांना निलंबित करण्यात आले आहे. वाघुले यांनी बंदोबस्ताची आवश्यक माहिती संबंधित पोलीस ठाण्याला (तोफखाना) वेळेत न दिल्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांचे निलंबन केले आहे.

- Advertisement -

सभापती शिंदे हे गेल्या शनिवार व रविवार (21 व 22 जून) रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. शनिवारी त्यांनी अहिल्यानगरमध्ये मुक्काम केला होता, तर रविवारी नेवासा तालुक्यातील विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग निश्चित करण्यात आला होता. मात्र रविवारी ऐनवेळी त्यांच्या दौर्‍यात बदल होऊन ते सावेडीतील माऊली संकुल येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे ठरले. या अचानक झालेल्या बदलाची माहिती अंमलदार वाघुले यांना नियंत्रण कक्षामार्फत मिळाली होती. मात्र त्यांनी ही महत्त्वाची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याला वेळेत दिली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेला अखेरच्या क्षणी गडबडीत बंदोबस्त उभारावा लागला. ही बाब सभापती शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे ती तात्काळ मांडली.

पोलीस अधीक्षक घार्गे यांनी यासंदर्भात तातडीने प्राथमिक चौकशी केली असता, वाघुले याने बंदोबस्ताबाबत कसुरी केल्याचे स्पष्ट झाले. परिणामी त्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...