Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! युवा संघर्ष यात्रा विधानभवनाकडे जाताना अडवली; रोहित पवारांना पोलिसांनी घेतले...

मोठी बातमी! युवा संघर्ष यात्रा विधानभवनाकडे जाताना अडवली; रोहित पवारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नागपूर | Nagpur

- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी काढलेली युवा संघर्ष यात्रा (Yuva Sangharsh Yatra) आज नागपूर (Nagpur) येथे धडकली असून याठिकाणी यात्रेचा समारोप होत आहे. नागपूरच्या टेकडी परिसरात या युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाची जाहीर सभा पार पडली. या सभेला महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) सर्व नेत्यांनी हजेरी लावली होती. या सभेनंतर रोहित पवार यांनी त्यांचा मोर्चा थेट विधानभवनावर नेला. मात्र, पोलिसांनी संघर्ष यात्रा रस्त्यातच अडविल्याने रोहित पवार यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी रोहित पवारांना ताब्यात घेतले…

देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद – शरद पवार

रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे (State Government) काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या स्वीकारण्यासाठी राज्य सरकारचे जबाबदार व्यक्ती हजर नसल्याने रोहित पवार आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Youth) कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जर कोणी जबाबदार व्यक्ती निवेदन स्वीकारण्यास येणार नसेल तर आम्ही विधानभवनात (Vidhanbhavan) जाऊन निवेदन देऊ, असे रोहित पवार युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाच्या भाषणावेळी म्हणाले होते.

Maratha Reservation : हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणाबाबत चर्चा

त्यानंतरही रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन स्वीकारण्यास कोणी न आल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानभवानकडे कूच केली. यावेळी या कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी (Police) काही प्रमाणात लाठीचार्ज केला. यानंतर रोहित पवारांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Crime News : मालमत्तेच्या वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या