Thursday, March 13, 2025
Homeनगरपोलिसांच्या जागेवरच ‘ताबेमारी’

पोलिसांच्या जागेवरच ‘ताबेमारी’

अहिल्यानगर परिसरातील 12 एकरमधील प्रकार || पक्क्या इमारती केल्या उभ्या

  • सचिन दसपुते

अहिल्यानगर- अहिल्यानगर शहरात सर्वसामान्य नागरिकांच्या जागेवर ‘ताबेमारी’चे प्रकार ताजे असताना आता तर दुय्यम पोलिस मुख्यालय व पोलिस अधिकारी, अंमलदारांच्या वसाहतीसाठी राखीव असलेल्या सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील 12 एकर जागेच्या काही गुंठ्यामध्ये चक्क एका बांधकाम व्यावसायिकाने ‘ताबेमारी’ केल्याचा प्रकार भूमी अभिलेख कार्यालयाने केलेल्या मोजणीतून उघडकीस आला आहे. त्या व्यावसायिकाने तेथे पाच बंगले आणि 60 फ्लॅटची एक इमारत उभी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्वसामान्या लोकांच्या मालमत्तेवर ताबेमारी करणार्‍या टोळ्या शहरात सक्रिय असून आता तर त्यांनी चक्क पोलिसांच्या जागेवरच ‘ताबेमारी’ करण्याची हिंमत केली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात पोलिस मुख्यालयाची जागा असून त्या ठिकाणी पोलिस परेड, पोलीस दलाच्या क्रिडा स्पर्धा, पोलिसांना शस्त्र प्रशिक्षण, नव्याने भरती होणार्‍या पोलिसांना शिस्तीचे धडे दिले जातात.

तसेच तेथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थाने आहेत. तर, तपोवन रस्त्यावरील गट क्रमांक 50/2 व 55/7 मधील 12 एकर जागा पोलिस उपमुख्यालय म्हणून ओळखली जाते. ती जागा सध्या मोकळीच आहे. तेथे दुय्यम पोलिस मुख्यालय व पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी वसाहती उभ्या केल्या जाणार आहे. पूर्वी तपोवन रस्ता अस्तित्वात नसल्याने या जागेसाठी स्वतंत्र्य रस्ता त्या 12 एकरमधून निर्माण केला गेला होता. तो जुना पिंपळगाव माळवी रस्त्याला जोडला गेला आहे. हा रस्ता गट क्रमांक 55/7 मध्ये आहे. दरम्यान, त्या लगतच गट क्रमांक 56 असून ती खासगी व्यक्तीची जागा आहे. या जागेची मोजणी तात्कालीन भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी केली होती. गट क्रमांक 56 मधील खासगी जागा एका बांधकाम व्यावसायिकाने विकसित करण्यासाठी घेतली होती.

- Advertisement -

त्या बांधकाम व्यावसायिकाने ही जागा विकसित करताना तेथे पाच बंगले (रो हौसिंग) उभे केले तसेच एक 60 फ्लॅटची भव्य इमारतही बांधली. दरम्यान, ते बांधकाम करत असताना पोलिस विभागाच्या गट क्रमांक 55/7 मधील 39 गुंठ्यापैकी सुमारे 25 ते 30 गुंठे जागा बळकावली गेली आहे. रस्त्यासाठी वापरल्या गेलेल्या जागेवरच ताबेमारी गेली आहे. हा सर्व प्रकार पोलीस दलाने भूमी अभिलेख कार्यालया मार्फत दोन वेळा केलेल्या मोजणीतून समोर आला आहे. त्यानंतर त्यांनी तिसर्‍या मोजणीत हद्द निश्चित केली आहे. चक्क पोलिसांच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या लक्ष्यात येताच त्यांनीही डोक्याला हात लावला आहे.

पोलिस विभागाला ही जागा उपयोगात आणायची असल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधीत जागेबाबत माहिती घेतली. त्या जागेची मोजणी करण्यास सांगितले गेले. भूमी अभिलेख कार्यालयाने दोन वेळा ही मोजणी केली असता खासगी व्यक्तीची जागा असलेल्या गट क्रमांक 56 मधील बांधकाम पोलिसांच्या गट क्रमांक 55/7 मध्ये सरकले असल्याचे समोर आले. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाने तिसर्‍या वेळी हद्द निश्चिती करून दिली आहे.

मोजणीनंतर आले उजेडात
पोलिस विभागाची 12 एकर जागा पोलिस दलाच्या कामकाजासाठी वापरण्याचा निर्णय अधीक्षक राकेश ओला यांनी घेतला आहे. त्यांनी या जागेची मोजणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी भूमी अभिलेख विभागाशी पत्रव्यवहार करून मोजणीची मागणी केली. भूमी अभिलेख विभागाने एकदा नवे तर दोन वेळा मोजणी केली, त्यानंतर गट क्रमांक 55/7 मधून करण्यात आलेल्या रस्त्यावरच इमारती उभ्या राहिल्या असल्याचे समोर आले. तिसर्‍या वेळी भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी करून हद्द निश्चित करून दिली आहे.

तपोवन रस्त्यावरील पोलिस विभागाच्या जागेची भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी केली. त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. ते अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांना नोटीसा दिल्या जाणार आहेत. त्यांनी अतिक्रमण काढले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल.

– राकेश ओला, पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...