police permission requires for DJ
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नुकताच पोलीस आयुक्तांनी commissioner of police फलक लावण्यापूर्वी पोलीस आयुक्तालयाची परवानगी घ्यावी असा आदेश काढल्यानंतर त्या पाठोपाठ आता शहरात बॅन्ड आणि डीजे वाजवायला Band & DJ देखील पोलीस आयुक्तांची परवानगी लागेल असा निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त या पदासाठी अनेक अधिकार असतात. त्यांचा वापर पोलीस आयुक्त दीपक पांडेय करत असल्याचे यातून दिसून येत आहे. कार्यक्रमांसाठी बॅन्ड किंवा डीजे वाजविण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
जिल्ह्यात जिल्हाधिकारी, तर शहरात पोलिस आयुक्त हे जिल्हा न्यायदंडाधिकारी असतात. जिल्हाधिकारी ज्याप्रमाणे शंभर ते सव्वाशे समित्यांचे प्रमुख तर शहरातील कामकाजासाठी तितक्याच किंबहुना त्याहून अधिक स्वरूपाच्या कामासाठी कायदेशीर पातळीवर पोलिस आयुक्त हे प्रमुख आहेत.
महानगरासाठी न्यायदंडाधिकारी पदाचे अधिकार असलेल्या या यंत्रणेची प्रशासकीय व्यवस्था पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सूत्र स्वीकारल्यापासून पोलिसांची प्रशासकीय व्यवस्था आणखी मजबूत करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. शहरातील कायदा सुव्यवस्थेपासून तर जलस्रोत, नदी संरक्षण, मोर्चे आंदोलनाच्या परवानगीपासून जल आणि ध्वनिप्रदूषणसारख्या विषयात पोलिसांनी परवानगीचे धोरण आखले आहे.




