Tuesday, August 18, 2026
Homeक्राईमश्रीरामपूरात बंद घरावर पोलिसांची कारवाई; हत्यारे, मुलींचे फोटो व संशयास्पद साहित्य जप्त

श्रीरामपूरात बंद घरावर पोलिसांची कारवाई; हत्यारे, मुलींचे फोटो व संशयास्पद साहित्य जप्त

श्रीरामपूर | प्रतिनिधी
शहरातील सरस्वती कॉलनी परिसरातील एका बंद घरावर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा धडक कारवाई करत घराचे कुलूप तोडून झडती घेतली. या कारवाईत काही हत्यारे, अनेक मुलींची छायाचित्रे, रुग्णालयाशी संबंधित कागदपत्रे, गर्भनिरोधक गोळ्या तसेच अन्य संशयास्पद साहित्य आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू असून, त्यामागील नेमके स्वरूप आणि उद्देशाचा शोध घेतला जात आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार शीघ्र कृती दलाच्या २० हून अधिक जवानांनी ही कारवाई केली. संबंधित घर हे शहरातील एका व्यक्तीच्या मालकीचे असून ते करारनाम्याद्वारे भाड्याने देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. बंद अवस्थेतील घराचे कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला आणि संशयास्पद साहित्य ताब्यात घेतले.

- Advertisement -

या कारवाईबाबत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विशाल खैरे यांनी तपास सुरू असल्याने जप्त साहित्याबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. कारवाई पूर्ण झाल्यानंतर यासंदर्भात अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शनिवारी शहरातील तरुण व्यावसायिक आकाश शेखर दुबय्या यांच्या हत्येनंतर पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून विविध ठिकाणी शोधमोहीम आणि धडक कारवाया सुरू आहेत. सरस्वती कॉलनीतील या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा अलीकडील गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांकडून तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि पुढील कारवाईबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.

सार्वमतच्या फेसबुक पेजला फॉलो करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...