Saturday, July 25, 2026
Homeक्राईमCrime News : पोलीस ठाण्यातच दोन तरूणांचा धिंगाणा

Crime News : पोलीस ठाण्यातच दोन तरूणांचा धिंगाणा

आरडाओरड, झोंबाझोंबी व मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन तरूणांनी पहाटे पोलीस ठाण्याच्या आवारातच गोंधळ घालत एकमेकांशी झोंबाझोंबी व मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी दोघांविरूध्द सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस अंमलदार रामनाथ हंडाळ यांनी फिर्याद दिली आहे. गणेश संजय भंडारी (वय 26, रा. बुरूडगाव रोड, भोसले आखाडा) व मयुर चंद्रकांत कांडेकर (वय 24, रा. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अंमलदार हंडाळ इतर सहकार्‍यांसोबत रात्र ड्यूटीवर होते. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास जखमी अवस्थेतील अक्षय कांडेकर (रा. सारसनगर) हा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी त्याची माहिती घेऊन उपचारासाठी वैद्यकीय मेमो दिला. त्यानंतर आणखी दोन तरूण पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी मोठ्याने आरडाओरड केला.

ड्युटीवरील पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी पोलिसांचे कोणतेही न ऐकता एकमेकांशी झोंबाझोंबी करत मारहाण सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. नाईट ऑफिसर सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनीही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांशीही हुज्जत घालत गोंधळ सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी दोघांना शांत करून त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे गणेश संजय भंडारी आणि मयुर चंद्रकांत कांडेकर अशी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या