Wednesday, June 10, 2026
HomeनगरBribery News : पोलीस उपनिरीक्षकाचा ‘लाचेचा खेळ’ उघड!

Bribery News : पोलीस उपनिरीक्षकाचा ‘लाचेचा खेळ’ उघड!

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयेश मोतीलाल गांगुर्डे याच्याविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (27 मे) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नाशिक येथून गांगुर्डे याला ताब्यात घेतले असल्याचे उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी सांगितले. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक गांगुर्डे हा तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असून, त्याने एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी सुरूवातीला दोन लाख रूपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोडीनंतर एक लाख रूपयांवर व्यवहार निश्चित करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदार यांनी 18 मे 2026 रोजी तक्रार नोंदवली होती. तक्रारदाराच्या मामासह 15 जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक गांगुर्डे याच्याकडे होता. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि आरोपींना सहकार्य करण्याच्या मोबदल्यात गांगुर्डे याने दोन लाख रूपयांची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. यानंतर पंचांसमक्ष येथील पोलीस मुख्यालयाच्या गेटवर पडताळणी कारवाई केली असता संबंधित गुन्ह्यात मदत करण्यासाठी गांगुर्डे याने तक्रारदाराकडे एक लाख रूपयांची लाच मागण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंद करून गांगुर्डे याला ताब्यात घेतले आहे.

आठ दिवसांपूर्वीच मिळाली पदोन्नती
गेल्या आठ दिवसांपूर्वीच उपनिरीक्षक गांगुर्डे याची सहायक निरीक्षकपदी पदोन्नती झाली होती. त्याची बदली नाशिक येथे झाली आहे. दरम्यान, पदोन्नतीनंतर त्याला कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. येथील पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी त्याला पाठविण्यात आले होते. तेथे त्याने तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी केली. दरम्यान, त्याला मंगळवारी (26 मे) तालुका पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करण्यात आले आणि बुधवारी (27 मे) त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar Crime News : त्र्यंबकेश्वरमध्ये चार हॉटेल्सवर गुन्हे; ग्राहकांच्या नोंदी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) सुरक्षेचा मोर्चा हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांकडे वळवला आहे. पोलिस अधीक्षक डॉ....