Friday, June 20, 2025
HomeनगरAhilyanagar Police : श्रीरामपूर, कोपरगाव, शेवगाव, पाथर्डीसह 9 पोलीस ठाण्यांना नवीन प्रभारी

Ahilyanagar Police : श्रीरामपूर, कोपरगाव, शेवगाव, पाथर्डीसह 9 पोलीस ठाण्यांना नवीन प्रभारी

पोलीस अधीक्षक घार्गे यांचे आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील नऊ पोलीस ठाण्याला नवीन प्रभारी अधिकारी दिले आहेत. यामध्ये शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी, कोपरगाव शहर, श्रीरामपूर तालुका, घारगाव, मिरजगाव व खर्डा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. 6 पोलीस निरीक्षक व 3 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अधीक्षक घार्गे यांनी मंगळवारी काढले. अधीक्षक घार्गे यांनी पदभार हाती घेताच पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या केल्या.

- Advertisement -

दरम्यान, नाशिक परिक्षेत्रातील बदल्यांचे आदेश महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढल्यानंतर जिल्ह्यातंर्गत बदल्याची उत्सुकता होती. मंगळवारी अधीक्षक घार्गे यांनी नऊ पोलीस ठाण्याला नवीन प्रभारी अधिकारी दिले आहेत. पाथर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष मुटकुळे यांची शेवगाव ठाण्याच्या प्रभारीपदी बदली केली तर घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांना पाथर्डी ठाण्याचे प्रभारी केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना घारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले आहे.

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची बदली जामखेड पोलीस ठाण्याचे प्रभारीपदी करण्यात आली असून श्रीरामपूर तालुक्याला नियंत्रण कक्षातील अरूण धनवडे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांना कर्जत तर रामकृष्ण कुंभार यांना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले आहे. खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांची बदली मिरजगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांना खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले आहे. दरम्यान, जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरात जोरदार पाऊस; वाकी, पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण परिसरात गत तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल...