Wednesday, September 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBy-Election Result Update : बिहार, मध्यप्रदेशात भाजपाला धक्का बसण्याची शक्यता; नितीन नबीन...

By-Election Result Update : बिहार, मध्यप्रदेशात भाजपाला धक्का बसण्याची शक्यता; नितीन नबीन यांच्या गडाला प्रशांत किशोर भगदाड पाडणार?

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

देशातील बिहार, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीची (By-Election) मतमोजणी (Counting) सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली आहे. यामध्ये बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर (Prashant Kishor) आघाडीवर असून, भाजपचे नीरज सिंह पिछाडीवर आहेत. किशोर यांना दहाव्या फेरीपर्यंत एकूण २० हजार ०५९ इतकी मते मिळाली असून, ते भाजप (BJP) उमेदवारापेक्षा ६ हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजप उमेदवाराला दहाव्या फेरीपर्यंत १४ हजार ०४८ इतकी मते मिळाली आहेत.

तर मध्यप्रदेशातील दातिया विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे (Congress) घनश्याम सिंह आघाडीवर असून,भाजपचे आशुतोष तिवारी पिछाडीवर आहेत. सिंह यांना सहाव्या फेरीपर्यंत २५ हजार ८५६ इतकी तर भाजपच्या तिवारी यांना २४ हजार ७० मते मिळाली आहेत. त्यामुळे सिंह हे १७८६ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच गुजरातमधील (Gujarat) मांजलपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सतेंद्र भाई पटेल आघाडीवर असून, काँग्रेसचे भिकीमभाई राबेरी पिछाडीवर आहेत.बाराव्या फेरीपर्यंत सतेंद्र भाई पटेल यांना ३४ हजार ३४५ इतकी मते मिळाली असून, काँग्रेसच्या भिकीमभाई यांना १४ हजार ९७७ मते मिळाली आहेत . तर नोटाला १३६० मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा भाजपचा उमेदवार १९ हजार ३६८ मतांनी पुढे आहे.

बांकीपूरमध्ये ३० वर्षांपासून भाजपचे वर्चस्व

बांकीपूर विधानसभा मतदारसंघ (Bankipur Assembly Constituency) १९९५ पासून म्हणजेच सलग ३० वर्षे भारतीय जनता पक्षाचा (BJP) मजबूत बालेकिल्ला राहिला आहे. प्रथम नवीन किशोर प्रसाद सिन्हा आणि त्यानंतर त्यांचे पुत्र नितीन नबीन (Nitin Nabin) यांनी या जागेचे प्रतिनिधित्व केले.२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले नितीन नबीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राज्यसभेत गेल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. ३० जुलै रोजी या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अवघे ३४.३० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची धाकधूक वाढली होती.

बांकीपूरमध्ये एकूण किती मतदार?

बांकीपूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३,७९,६१६ इतके मतदार असून,यात २,००,०६० पुरुष आणि १,७९,५३३ महिला आणि तृतीयपंथी गटातील २३ मतदारांचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीच्या रिंगणात एकूण २५ उमेदवार आहेत, ज्यामध्ये २३ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेसाठी ५६९ कंट्रोल युनिट्स, १,१४६ बॅलट युनिट्स आणि ६१७ व्हीव्हीपॅट्स (VVPATs) वापरण्यात आले. मतदानादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे १४ बॅलट युनिट्स, सात कंट्रोल युनिट्स आणि नऊ व्हीव्हीपॅट्स बदलण्यात आले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान एकूण ५९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि त्या सर्व तक्रारींचे वेळेवर निवारण करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे गुरुवारी दि.३) नाशिक दौऱ्यावर येत असून, आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू...