Sunday, November 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : 'लोकतंत्र बचाव' सभेतून CM फडणवीसांचा काँग्रेसवर घणाघात; म्हणाले,"संविधान अन्...

Devendra Fadnavis : ‘लोकतंत्र बचाव’ सभेतून CM फडणवीसांचा काँग्रेसवर घणाघात; म्हणाले,”संविधान अन् मतचोरीचा…”

ठाणे | Thane

देशात निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्या राजीनाम्यासाठी ‘इंडिया’ आघाडीने आक्रमक पवित्रा घेत दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन पुकारले आहे. दुसरीकडे ठाण्यात सत्ताधारी महायुतीने (Mahayuti) ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रेच्या माध्यमातून विरोधकांना प्रत्युत्तर दिले. या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसवर, राहुल गांधींवर आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या इतिहासावरून तिखट शब्दांत निशाणा साधला.

- Advertisement -

काँग्रेसचा इतिहास संविधान चोरीचा आणि लोकशाही संपवण्याचा

सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “काँग्रेस (Congress) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकशाही संपवून देशात अराजकता माजवण्याचे षडयंत्र रचले आहे. यांची लढाई भाजप किंवा एनडीएशी नसून थेट भारताशी असल्याचे म्हटले. तसेच आणीबाणीच्या काळाची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, १९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची निवडणूक भ्रष्ट मार्गांमुळे रद्द ठरवली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या मतदानावर आणि भाषणावर मर्यादा आणल्या. यावर इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी संविधानात दुरुस्ती करून न्यायालयांचे अधिकार आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार गोठवले होते. काँग्रेसने व्होटचोरी नाही, तर थेट संविधानचोरी केली आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

हे देखील वाचा : Eknath Shinde :”बाळासाहेब असते तर…”; ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रेतून DCM शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

जनता पार्टीच्या सरकारने परत मिळवून दिले मूलभूत अधिकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार आणि त्यांच्या संरक्षणासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयात जाण्याची सोय काँग्रेसने १९७६ च्या घटनादुरुस्तीद्वारे हिरवून घेतली होती. पुढे जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर संविधानात पुन्हा सुधारणा करून नागरिकांचे मूलभूत अधिकार परत मिळवून दिले गेले आणि पंतप्रधानांना संविधानाच्या कक्षेत आणले गेले, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

चीनकडून मिळणाऱ्या निधीवरून राहुल गांधींवर प्रश्नांची सरबत्ती

राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यांवर आणि धोरणांवर टीका करताना फडणवीस म्हणाले, “इंदिरा गांधींचा नातू आज तीच जुनी दारू नवीन बाटलीत भरून रस्त्यावर उतरला आहे. राहुल गांधी व्हिएतनाम आणि थायलंडला का जातात? भारताच्या विरोधात कारवाया करणाऱ्या चीनसारख्या देशाकडून काँग्रेस आणि त्यांच्या ट्रस्टला डोनेशन का मिळते?”चीनच्या पैशांवर देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

लाल पुस्तकाच्या मुखवट्यामागे घटनात्मक संस्थांना बदनाम करण्याचे षडयंत्र

राहुल गांधी दाखवत असलेल्या ‘लाल संविधाना’वर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये ज्या लाल पुस्तकाचा वापर करून संविधाने बदलली गेली, तोच प्रयोग भारतात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. “संविधानाला थेट नाव ठेवले तर जनता जोड्याने मारेल, म्हणूनच संविधानाने निर्माण केलेल्या सीएजी, आरबीआय, संसद, निवडणूक आयोग आणि आता न्यायालयांसारख्या स्वायत्त संस्थांना बदनाम करून देशात अराजकता माजवण्याचा खेळ सुरू आहे,” असे फडणवीस यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Nashik : शिवतीर्थावर दीपोत्सवाचा लखलखाट; ‘महाकुंभ’ नावाची भव्य दीपमांडणी

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik हजारो पणत्यांच्या लखलखाटात 'महाकुंभ’’ नावाची भव्य दीपमांडणी, पारंपरिक गोदा आरती, फटाक्यांची आतषबाजी आणि लोकसंगीताच्या सुरांनी शिवतीर्थ परिसर रविवारी (दि. २२) उजळून...