Sunday, November 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde :"बाळासाहेब असते तर..."; 'लोकतंत्र बचाव' पदयात्रेतून DCM शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Eknath Shinde :”बाळासाहेब असते तर…”; ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रेतून DCM शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदींवरील टीकेचाही घेतला खरपूस समाचार

ठाणे | Thane

ठाण्यामध्ये (Thane) महायुतीतर्फे (Mahayuti) ‘लोकतंत्र बचाव’पदयात्रा आयोजित करण्यात आली असून, या पदयात्रेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी बोलतांना त्यांनी काही लोक रोज ‘मोदी आज जाणार, उद्या जाणार’ अशा गप्पा मारतात. पण हा काय यांच्या बापाचा माल आहे का? अशा शब्दांत हल्लाबोल केला.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, विरोधकांनी मोदींवर (PM Modi) खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका केली असली तरी जनतेने त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली. पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. आईच्या निधनानंतरही तत्काळ देशसेवेच्या कामाला लागणारे मोदींसारखे नेतृत्व शोधूनही सापडणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

२०१४ पूर्वीच्या कारभारावरून काँग्रेसवर निशाणा

२०१४ पूर्वीच्या परिस्थितीची आठवण करून देताना शिंदे म्हणाले, “२०१४ च्या आधीच्या काळात शेण खाणेही सरकारने सोडले नव्हते. त्या काळात पाकिस्तानला लव्ह लेटर पाठवली जायची. महाविकास आघाडीच्या काळात लोकशाहीचा गळा आवळला गेला होता. न्यायालयाने दिलेल्या निर्णयांवर मोर्चा काढणे हा लोकशाहीतील काळा दिवस होता. तसेच पुढील ५० वर्षे विरोधकांची सत्ता येणार नाही”, असेही त्यांनी सांगितले.

परकीय शक्तींशी हातमिळवणीचा आरोप

पंतप्रधानांच्या घराबाहेर होणाऱ्या आंदोलनांवर आणि विदेशातील वक्तव्यांवर टीका करताना शिंदे म्हणाले, “देशाची जनता मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जागतिक मंदी आणि युद्धाच्या काळात जिथे इतर देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, तिथे भारताने जगात चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल केली आहे. ३२ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्याचे काम मोदींनी केले. हे सहन होत नसल्यानेच विरोधक परकीय शक्तींसोबत हातमिळवणी करून परदेशात भारताची आणि मोदींची बदनामी करत आहेत”, असे त्यांनी म्हटले.

पायलट स्मित मच्छार प्रकरणावरून विरोधकांचा पर्दाफाश

जगभरात कौतुक झालेल्या पायलट स्मित मच्छार यांना विरोधकांनी साधा फोनही केला नाही, असा आरोप शिंदेंनी केला. “स्मार्ट पायलट स्मित मच्छार यांनी ‘नरेंद्र मोदी हे माझे प्रेरणास्थान आहेत’ असे म्हटल्यामुळेच विरोधकांच्या पोटात दुखले आणि त्यांनी त्यांचे कौतुक करण्याचे टाळले”, असे शिंदे म्हणाले.

बाळासाहेब असते तर मोदी-शहांना शाब्बासकी दिली असती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, कलम ३७० रद्द करणे आणि अयोध्येत भव्य राम मंदिराची निर्मिती करणे ही बाळासाहेबांची स्वप्ने होती. ही स्वप्ने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केली आहेत. आज जर बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी या धाडसी निर्णयांसाठी मोदी आणि शहा यांच्या पाठीवर कौतुकाची थाप नक्कीच दिली असती.

ताज्या बातम्या

मनमाडमध्ये पावसाची हजेरी; आठवडे बाजारात ग्राहकांसह व्यावसायिकांची तारांबळ

0
मनमाड | प्रतिनिधी Manmad शहरासह परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानकपणे आलेल्या या पावसाने आठवडे बाजारातील ग्राहकांसह व्यावसायिकांची त्रेधातिरपीट उडवून दिली. गेल्या तीन दिवसापासून परिसरात...