Saturday, September 12, 2026
HomeनाशिकNashik Politics : शिवसेनेच्या डावाने स्थायीचे गणित बदलले; नाशिक महापालिकेच्या आजच्या महासभेकडे...

Nashik Politics : शिवसेनेच्या डावाने स्थायीचे गणित बदलले; नाशिक महापालिकेच्या आजच्या महासभेकडे लक्ष

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेतील (Nashik Municipal Corporation) स्थायी समितीच्या रचनेत झालेल्या गट नोंदणी बदलांमुळे सत्ताकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेने (शिंदे गटा) ने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नगरसेविकेला आपल्या गटात सामील करून घेतल्यामुळे त्यांची सदस्यसंख्या २७ झाली आहे. सेनेच्या या डावाने स्थायीचे गणित बदलले असून सोमवारच्या (दि. १७) महासभेकडे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिकेतील स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या निवडीसाठी सोमवारी (दि. १६) सकाळी ११ वाजता राजीव गांधी भवन येथील सभागृहात विशेष महासभा होणार आहे. शिवसेनेच्या (Shivsena) तौलानिक संख्येत वाढ होऊन स्थायी समितीवर त्यांना एक अतिरिक्त जागा मिळणार आहे. याचा थेट फटका भाजपला बसणार असून, भाजपची एक जागा कमी होणार आहे. महापालिकेतील एकूण १२२ नगरसेवकांपैकी भाजपकडे ७२ सदस्य असले तरी तौलानिक गणितानुसार त्यांना आता ९ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) व मनसे आघाडीला ४ जागा, तर शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेस आघाडीला २ जागा मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष गटाला १ जागा मिळाण्याची शक्यता आहे. या बदललेल्या राजकीय समीकरणांम ळे स्थायी समिती निवडीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. महासभेत १६ सदस्यांची अंतिम नियुक्ती होणार आहे. विशेष महासभेनंतर शुक्रवारी (दि.२०) मासिक सर्वसाधारण सभा होणार असून, या सभेत सिंहस्थ मेळ्यासंदर्भातील भूसंपादन, सर्वेक्षण, सल्लागार नेमणूक, दरनिश्चिती व विविध नागरी योजनांवरील प्रस्ताव चर्चेला येणार आहेत.

स्थायी समितीत आम्हाला चार जागा मिळणार आहे. त्यात शिवसेना तीन तर मनसेला एक याप्रमाणे सदस्य राहणार आहे. संपर्कप्रमुख राम रेपाळे हे नावांची यादी देणार आहे.

अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना

ताज्या बातम्या

Kopargaon : समृद्धी महामार्गावरील चाकूच्या धाकाचा दरोडा उघडकीस

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon समृद्धी महामार्गावर आयशर वाहन दुरुस्त करणार्‍या मेकॅनिक व त्याच्या साथीदारांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत मोबाईल व रोख रक्कम लुटणार्‍या टोळीचा...