Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDhananjay Munde : राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित...

Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट; मंत्रिमंडळात वर्णी लागणार?

नवी दिल्ली | New Delhi

नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने बनावट दस्तावेज व फसवणुकीप्रकरणी क्रीडा व युवक कल्याणमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर माजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळे-राठोड यांनी नाशिक न्यायालयात मंत्री कोकाटे यांच्या अटकेसाठी आज (बुधवारी) अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी झाली असता न्यायालयाने कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. यामुळे कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाचा दणका; अटक वॉरंट जारी

याप्रकरणात कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वापसी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. माजी मंत्री आणि धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता की अजून काही याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.

हे देखील वाचा : Manikrao Kokate : मंत्री कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं ते सांगा; ‘वर्षा’वरील भेटीत CM फडणवीसांचा अजितदादांना थेट सवाल

दरम्यान, धनंजय मुंडे हे संसदेत जवळपास एक तास होते. यावेळी त्यांनी अमित शाह यांची संसदेतील कार्यालयात भेट घेतली. कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आलेले असतानाच धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.तर या भेटीमुळे मंत्रीपदासाठी धनंजय मुंडे यांनी अमित शाहांची भेट तर घेतली नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

१०० टक्के मंत्रिमंडळात कमबॅक होणार

धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना धनंजय मुंडे यांचे राज्याच्या मंत्रिमंडळात १०० टक्के कमबॅक होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ‘ती’ फाईल गंगापूररोडच्या एका बिल्डरची?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे आणि भाजपचे नगरसेवक सतीश निकम (Satish Nikam) यांच्यात झालेल्या वादाच्या केंद्रस्थानी असलेली ती फाईल...