Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकेंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत; नितीन गडकरींकडील मंत्रालय जाणार? देशाच्या अर्थमंत्रीपदासाठी 'या'...

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत; नितीन गडकरींकडील मंत्रालय जाणार? देशाच्या अर्थमंत्रीपदासाठी ‘या’ व्यक्तीचे नाव चर्चेत

जाणून घ्या मोदींच्या संभाव्य नवीन मंत्रिमंडळाची यादी

नवी दिल्ली | New Delhi

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फेरबदलात कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मोदी सरकारमधील (Modi Government) अनेक वजनदार मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात, तर काही नवीन चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

शक्तिकांत दास यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची धुरा?

या संभाव्य फेरबदलामध्ये आरबीआयचे गव्हर्नर आणि माजी आयएएस अधिकारी शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांना संधी मिळण्याची शक्यता असून, ते देशाचे नवे अर्थमंत्री होणार असल्याचे बोलले जाते. ६९ वर्षीय शक्तिकांत दास यांना शासकीय सेवा आणि आर्थिक क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. जर त्यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली, तर ते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसतील. शक्तिकांत दास सध्या संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत, त्यामुळे मंत्रिपदाची शपथ घेतल्यास त्यांना ६ महिन्यांच्या आत राज्यसभेवर पाठवावे लागेल. नोव्हेंबर २०२६ मध्ये उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागा रिक्त होत असल्याने, त्यांना यूपीमधून राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे.

निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण मंत्रालय?

सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे विरोधक विद्यमान शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांना या पदावरून हटवले जाऊ शकते.

नितीन गडकरींच्या मंत्रालयात फेरबदल होणार?

संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मंत्रालयात देखील फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता खरंच गडकरी यांच्या मंत्रालयात फेरबदल होतात का? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी, कोणाची उचलबांगडी?

आगामी विधानसभा निवडणुका आणि राजकीय समीकरणे लक्षात घेऊन या फेरबदलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पसंतीचाही विचार केला जाऊ शकतो, कारण नुकतीच भाजप नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवनीत सिंग बिट्टू यांच्यावर पंजाबची जबाबदारी सोपवून तरुण चुघ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

  • मंत्रिमंडळात सामील होणारे संभाव्य नवीन चेहरे

नितीश कुमार (माजी मुख्यमंत्री, बिहार)

शक्तिकांत दास (आरबीआय गव्हर्नर)

श्रीकांत शिंदे (खासदार)

राघव चढ्ढा (खासदार)

सुखेंदू शेखर रॉय

तरुण चुघ

अनुराग ठाकूर

  • ज्यांची खाती बदलू शकतात किंवा मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते

निर्मला सीतारामन (संभाव्य नवीन शिक्षणमंत्री)

धर्मेंद्र प्रधान (नीट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गाजलेले नाव)

नितीन गडकरी

अश्विनी वैष्णव

मनोहर लाल खट्टर

हरदीप सिंग पुरी

रवनीत सिंग बिट्टू (निवडणुकीच्या जबाबदारीसाठी संघटनावरील काम)

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...