Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात 'प्रहार' च्या कार्यकर्त्यांचा राडा; पोलिसांनी...

Ajit Pawar : पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात ‘प्रहार’ च्या कार्यकर्त्यांचा राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | Pune

मागील सात दिवसांपासून राज्याचे माजी मंत्री बच्चू कडूंचे (Bacchu Kadu) विविध मागण्यासाठी अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. यामुळे कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली असून, त्यांना तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्याची आवश्यकता आहे. कडू यांच्या या उपोषणाचे पडसाद आज पुण्यात देखील उमटले असून ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) कार्यक्रमावेळी गोंधळ घालत घोषणाबाजी केली.

- Advertisement -

यावेळी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना (Farmer) कर्जमाफी देण्यासह माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्या अशी मागणी अजित पवार यांच्यासमोर भर कार्यक्रमात (Program) केली. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले. तसेच बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कार्यक्रमात घोषणा दिल्या आणि अजित पवार यांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले.

अजित पवार काय म्हणाले?

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता अजित पवार यांनी बच्चू कडू यांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकारने काय भूमिका घेतली आहे याची माहिती दिली. ते म्हणाले की, “बच्चू कडू यांच्या उपोषणासंदर्भात आणि त्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बच्चू कडू यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील बच्चू कडू यांच्याबरोबर चर्चा केली. तसेच बच्चू कडू यांच्याबरोबर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे चर्चा केली. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबाबत एक समिती तयार करू, त्या समितीत बच्चू कडू यांचाही समावेश करू आणि त्यानंतर ती समिती जो अहवाल सरकारला देईल त्यानंतर राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल, असं मुख्यमंत्र्यांनी कडू यांना सांगितल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Nashik News : आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ‘उलगुलान’ मोर्चा मुंबईच्या दिशेने;...

0
नाशिक | Nashik आदिवासी विद्यार्थ्यांचे (Tribal Student) प्रलंबित प्रश्न आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सकल आदिवासी समाजाने पुकारलेला 'उलगुलान' मोर्चा सोमवारी...