Tuesday, November 24, 2026
HomeराजकीयChhagan Bhujbal : "...तर शरद पवार केंद्र सरकारला मदत करू शकतात"; मंत्री...

Chhagan Bhujbal : “…तर शरद पवार केंद्र सरकारला मदत करू शकतात”; मंत्री भुजबळांचे ‘त्या’ चर्चेवरून सुतोवाच, नेमकं काय म्हणाले?

कुंभमेळा आणि गोदावरी प्रदूषणावरही केलं रोखठोक भाष्य

नाशिक | Nashik

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, शरद पवारांची राष्ट्रवादी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार तसेच एनडीमध्ये सहभागी होणार, अशा जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या संदर्भात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आता या संपूर्ण विषयासह विविध मुद्द्यांवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, “शरद पवार (Sharad Pawar) ‘एनडीए’मध्ये सामील होतील, असे मला वाटत नाही. मात्र, एखाद्या विशिष्ट विषयावर योग्य वाटल्यास केंद्र सरकारला मदत करण्याची भूमिका ते घेऊ शकतात, असे सुतोवाच करून भुजबळांनी आगामी हिवाळी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा मिळू शकतो, असे संकेत दिले आहेत. परंतु, शरद पवार निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत फक्त चर्चा सुरू असतात असे म्हणत डिलिमिटेशनचा (परिसीमन) विषय योग्य असेल तर ते मदत करतील”, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

दुष्काळी उपाययोजना आणि मदतीवरही केलं भाष्य

पुढे ते म्हणाले की,”राज्यात दुष्काळी (Drought) तालुके व मंडळांची संख्या वाढत असून, नाशिक तालुक्यातील काही मंडळांमध्येही बिकट परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी राखून ठेवणे, केसरी कार्डधारकांना मोफत अन्नधान्य देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणणे, तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करणे या बाबींवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. मनरेगातून पाणलोट क्षेत्राची कामे करण्याचे आदेश दिले असून, दुष्काळी मदतीसाठीचा अभ्यास आणि पाहणी समितीच्या अहवालानंतर अंतिम निर्णय होईल, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.तसेच कोयनेचे पाणी वळवणे आणि अलमट्टी धरणाच्या मुद्द्यावर तज्ज्ञ व मुख्यमंत्र्यांचा अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाव बदलापेक्षा कामांवर भर द्यावा

तसेच नाशिकमधील (Nashik) गांधी तलावाचे नाव बदलून ‘दुतोंड्या तलाव’ करण्याच्या महंत सुधीर दास यांच्या मागणीवर बोलताना भुजबळ म्हणाले की, “नाव बदलाच्या वादात न पडता कुंभमेळ्याची कामे वेळेत व योग्य रीतीने पूर्ण करण्यावर भर देणे आवश्यक आहे. तर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कायमस्वरूपी दारूबंदी आणि मांस बंदीच्या मागणीवर बोलताना ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

गोदावरी प्रदूषण रोखणे हेच सर्वोच्च प्राधान्य

पुढे बोलताना भुजबळांनी कुंभमेळ्यासाठी (Kumbhmela) हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च होत असताना, गोदावरी नदीचे प्रदूषण थांबवणे हेच पहिल्या क्रमांकाचे काम असले पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली. तसेच नदीचे पाणी स्वच्छ करणे सर्वात महत्त्वाचे असून, उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील नावांबाबत बोलताना त्यांनी प्रवीण गेडाम आणि तुकाराम मुंढे हे कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

जावेद अख्तर यांना समता पुरस्कार

दरम्यान २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांची पुण्यतिथी असल्याने त्यानिमित्त पुण्यातील महात्मा फुले वाड्यात एक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी, लेखक व गीतकार जावेद अख्तर यांना ‘समता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून, या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

शरद

‘एक गोष्ट सांगतो…’; शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

0
मुंबई | Mumbaiशरद पवार हे येत्या 12 डिसेंबरला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राजकारणातून निवृत्ती जाहीर करतील, असे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात...