Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "भाजप नेत्यानेच EVM हॅक..."

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “भाजप नेत्यानेच EVM हॅक…”

मुंबई |Mumbai

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतचोरीचा आरोप केला होता. यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आज (सोमवार) दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘एसआयआर’ आणि ‘मतचोरीच्या’ आरोपांवरून संसदेपासून ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला.मात्र, हा मोर्चा पोलिसांनी अडवत विरोधी पक्षाच्या खासदारांना ताब्यात घेतलं. त्यानंतर यावरून शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य करतांना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, “आमची लढाई ही निवडणूक आयोगाविरोधात आहे, मग सरकार का मध्ये पडतं आहे, हे आता उघड झाले आहे. अमुक मते आपल्या विरोधात आहेत, म्हणून मतांची छाटणी करायची, हा प्रकार बरोबर नाही याला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. निवडणूक आयोगावर इंडिया आघाडीच्या खासदारांनी मोर्चा काढला होता. मात्र, सरकारने विरोधी पक्षाच्या खासदारांना अटक केली. हे लांच्छनास्पद आहे”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “खासदारांना (MP) पोलिसांनी (Police) निवडणूक आयोगाकडे नेतो असं सांगत त्यांना अटक केली. संविधानिक मार्गाने मोर्चा काढलेला असताना अटक करणे हा आपल्या लोकशाहीला बट्टा आहे. हा बट्टा सरकारने लावला आहे. सरकारने मतांची चोरी केली आणि आपली चोरी सरकारला लपवायची आहे”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

भाजप नेत्यानेच EVM हॅकचे प्रात्यक्षिक दाखवले

केवळ विधानसभा निवडणुकीतच नाही तर याआधीच्याही निवडणुकीत मला लोक भेटले होते. आमची भाजपशी युती होती तेव्हा ईव्हीएम कसे हॅक होते, याचे प्रात्याक्षिक भाजपच्या एका नेत्याने आम्हाला दाखवले होते, असा गौप्यस्फोटही ठाकरे यांनी केला. तसेच भाजपचे ते कोण नेते होते असे विचारले असता, आता ते नेते नाहीत, नुसतेच पक्षात आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

न्यायालयात जाऊन काय करावं?

निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांतील कथित घोळाप्रकरणी तुम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार का? असाही प्रश्न यावेळी ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, न्यायालयात जाऊन काय करावं. डिलिट झालेली नावे न्यायालयाला देणं आम्हाला बंधनकारक नाही असे आयोग म्हणते. निवडणूक आयोग हे न्यायालयाच्या वर आहे का? राष्ट्रपतींच्याही वर निवडणूक आयुक्त आहेत का? असे अनेक सवाल ठाकरेंनी उपस्थित केले.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...