Thursday, March 13, 2025
HomeनाशिकPolitical Special : शिवसेनेतील गटबाजीनंतरही इनकमिंग जोरात

Political Special : शिवसेनेतील गटबाजीनंतरही इनकमिंग जोरात

अनेक माजी नगरसेवकांच्या प्रवेशाने बळ वाढले

नाशिक | Nashik

शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस (Shiv Sena Thackeray Group and Congress) या दोन्ही पक्षांतील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात (Shivsena Shinde Group) प्रवेश घेतल्यामु‌ळे पक्षाची बळकटी वाढली असली तरी अंतर्गत राजकारणातून वैयक्तिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वीच शिंदे गटात अन्य पक्षांतील माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रवेश झाले आहेत. शिंदे गटात सुरू असलेल्या गटबाजीनंतरही शिवसेनेत दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसच्या प्रवक्त्या माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, ठाकरे गटाच्या युवासेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक दातीर आणि माजी नगरसेविका रंजना बोराडे यांचा प्रवेश सोहळा पार पडला, यासाठी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे यांनी पुढाकार घेतला.

त्यानंतर शिवसेनेचे (Shivsena) उपनेते विजय करंजकर, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे यांच्या पुढाकाराने बुधवारी रात्री (दि.१२) ठाणे येथे मनसेचे माजी नगरसेवक योगेश शेवरे, विधानसभा निवडणुकीदरम्यान ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक पवन पवार आणि काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बंदना पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षाची ताकद वाढविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असले तरी परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो.

माजी नगरसेवक मधुकर जाधव व साहेबराव दातीर यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर माजी नगरसेवक समीर कांबळे, सुषमा पगारे यांनी प्रवेश केला. गेल्या महिन्यांत पुन्हा माजी नगरसेविका इंदूबाई नागरे, समिना मेमन यांचा प्रवेश झाला होता. अवघ्या दोन दिवसांत ठाकरे गटातील तीन आणि काँग्रेस व मनसेचा प्रत्येकी एक अशा पाच माजी नगरसेवकांनी धनुष्यबाण हाती घेतले असून, या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे.

उबाठा युवासेनेला धक्का?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मनसे, उबाठा गटाच्या कार्यकत्यांनी केलेल्या प्रवेशानंतर उबाठा युवासेनेचे पदाधिकारीही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धर बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्का बसणार आहे. मागील लोकसभेच्या निवडणुकीत (Loksabha Election) मिळालेल्या यशाने उबाठा शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते तर विधानसभेला मिळालेल्या अपयशाने उबाठा गटाला धक्का बसला होता. त्यातूनच अनेक वरिष्ठ पदाधिकारीही भाजपाशी संधान साधून होते. तर काही अटी शर्तींवर भाजपचा प्रवेश काहींचा राहिलेला होता. त्यातच आता उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा हात धरण्याचे ठरवले असून येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्राथमिक स्वरूपात झालेल्या बोलणीवरून भाजपचे महसूलमंत्री व पक्षप्रमुख राहिलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना कार्यकत्यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा युवा शिवसेनेची ताकद कमी होणार असून भाजपाच्या युवा मोर्चाची ताकद वाढणार आहे.

महिनाभरात दहा माजी नगरसेवक शिंदे गटात

महिनाभरातच शिवसेनेत १० माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्याने शिवसेनेची नाशिकमधील (Nashik) ताकद वाढू लागली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये दोन गट असल्याचे दिसून येत असले तरी चढाओढीत या दोन्ही गटांकडून महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचा धडका लावलेला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...