Friday, September 25, 2026
HomeनगरAhilyanagar : प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी भाजपच्यावतीने चार उमेदवारी अर्ज

Ahilyanagar : प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी भाजपच्यावतीने चार उमेदवारी अर्ज

आणखी पाच इच्छुक || देवळालीच्या पठारेचा काँग्रेस पक्षाच्या नावे अर्ज

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपच्यावतीने राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे चार उमेदवारी अर्ज नेण्यात आले आहेत. हे सर्व अर्ज भाजपच्यावतीने घेण्यात आले असून राहुरीचे अमोल गुलदगड यांनी तनपुरे यांच्या नावे भाजप पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज नेले आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्यावतीने देवळाली प्रवरा येथील तुकाराम भिमराज पठारे यांच्यासाठी अभिषेक ढूस यांनी एक उमेदवारी अर्ज नेलेला आहे. तर शेवगावच्या एका अपक्ष इच्छुकांने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

- Advertisement -

विधान परिषदेच्या नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी शनिवारी पाच इच्छुकांनी 9 उमेदवारी अर्ज नेलेले आहेत. तर एकाचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. सोमवार (दि.25) पासून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 32 इच्छुकांनी 48 उमेदवारी अर्ज नेलेले आहेत. यातील अवघे दोन अपक्षांचे अर्ज दाखल झालेले आहेत. सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करण्यास मुदत असून अखेरच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत आता भाजप महायुतीच्यावतीने माजी आ. प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी आता अंतिम झाल्याचे दिसत आहे.

शनिवारी दुपारी तनपुरे यांच्यासाठी भाजप पक्षाच्यावतीने अमोल गुलदगड यांनी चार उमेदवारी अर्ज नेलेले आहेत. तर भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने देवळाली प्रवरा येथील तुकराम भिमराज पठारे यांच्यासाठी अभिषेक ढूस यांनी एक तर दुसरा अपक्ष म्हणून अर्ज नेलेला आहे. यासह अकोले धुमाळवाडी येथील मच्छिंद्र पांडूरंग धुमाळ यांच्यासाठी प्रमोद संतू मंडलिक यांनी दोन अपक्ष, श्रीगोंदा येथील प्रविण नहाटा यांच्यासाठी अक्षय शेंडगे लोणी काळभोर यांनी एक अपक्ष उमेदवारी अर्ज नेलेला आहे. शनिवारी 5 इच्छुकांनी 9 उमेदवारी अर्ज नेले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली. त्याच सोबत शेवगाव येथील कमलेश हिस्तीमल गांधी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला असून त्यांच्या अर्जावर कैलास तिजोरे, रिजवान शेख, विता फडके, गीता लांडे, अजिंक्य लांडे, ज्योती लिंगे, दिपाली बंग, दिप्ती गांधी, नितीन दहिवाळकर, विनायक मोहिते यांच्या अनुमोदक म्हणून नावे आहेत.

अंतिम मतदार यादी प्रसिध्द
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 461 मतदारांची प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रसिध्द केली होती. या यातील नाव, पत्ता, यासह अन्य बदलांबाबत 41 आक्षेप घेवून ते दुरूस्त करण्यात आले आहेत. त्यानंतर निवडणुकीसाठी 461 मतदारांची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने देण्यात आली.

ताज्या बातम्या

विसर्जन

Nashik Ganesh Visarjan Miraunuk: विसर्जन मिरवणुकीवर भद्रकालीचाच प्रभाव !२५ पैकी तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधीश्री गणेश विसर्जन मुख्य मिरवणूकी च्या नियोजनाची आणि क्रमाची अधिकृत यादी जाहीर झाली असून, या यादीवरून यंदाच्या मिरवणुकीचे वेगळे वैशिष्ट्य समोर आले...