Friday, September 25, 2026
HomeनगरRahuri : प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर ?

Rahuri : प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर ?

प्रवेश झाल्यास विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून तनपुरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असून पक्ष प्रवेशानंतर त्यांना विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

गेल्या महिन्यात पार पडलेली राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय तनपुरे यांनी घेतला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. आता याच आठवड्यात ते भाजपचे कमळ हातात घेण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार आहे.

दरम्यान, तनपुरे यांच्या संदर्भात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना विचारले असता, याबाबत आमच्याकडे अजून माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, विधान परिषद निवडणुकीमुळे काही लोक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यासाठी भाजपने दबावतंत्राचा वापर केला आहे. परंतु, तनपुरे यांनी अद्याप पक्षाचा राजीनामा दिलेला नाही, असे शिंदे म्हणाले.

ताज्या बातम्या

विसर्जन

Nashik Ganesh Visarjan Miraunuk: विसर्जन मिरवणुकीवर भद्रकालीचाच प्रभाव !२५ पैकी तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधीश्री गणेश विसर्जन मुख्य मिरवणूकी च्या नियोजनाची आणि क्रमाची अधिकृत यादी जाहीर झाली असून, या यादीवरून यंदाच्या मिरवणुकीचे वेगळे वैशिष्ट्य समोर आले...