Wednesday, August 19, 2026
HomeनगरBhandardara : निळवंडेतून 6380 क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू

Bhandardara : निळवंडेतून 6380 क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू

मुळातील पाणीसाठा 92 टक्क्यांवर

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेले भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून रतनवाडी आणि घाटघरमध्ये श्रावणसरींचा जोर वाढल्याने निळवंडे धरणातून 6380 क्युसेकने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 8271 दलघफू (99.92 टक्के) होता.
भंडारदरा धरणात गत 24 तासांत 400 दलघफू पाण्याची नव्याने आवक झाली. त्यामुळे या धरणातून 3135 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. काल सायंकाळी 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात 11013 दलघफू (99.76 टक्के) पाणीसाठा कायम होता.

- Advertisement -

वाकी तलावातून 556 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. गत 24 तासांत झालेला पाऊस असा (मिमी)-भंडारदरा 46, रतनवाडी 82, घाटघर 75, पांजरे 57, वाकी 41.

दरम्यान, कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटात पाऊस काहीसा वाढल्याने मुळा धरणात आवक वाढु लागली आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल रात्री उशीरा पाणीसाठा 92 टक्क्यांवर पोहचला होता. सोमवारी सायंकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसगर 4705 होता. तो वाढून मंगळवारी सायंकाळी 5060 क्युसेकवर पोहचला होता. साठा 23890 दलघफू झाला होता.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 15 सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या चार महिन्यांपासून प्रशासक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी...