Thursday, October 1, 2026
HomeनाशिकMalegaon News: महानगरपालिका कार्यालयात नमाज पठण भोवलं; विद्युत अधीक्षक अभिजीत पवारांवर निलंबनाची...

Malegaon News: महानगरपालिका कार्यालयात नमाज पठण भोवलं; विद्युत अधीक्षक अभिजीत पवारांवर निलंबनाची कारवाई

मालेगाव | प्रतिनिधी
प्रभागात पथदीप सुरू नसल्याबद्दल वारंवार तक्रारी करून देखील मनपा विद्युत विभागातर्फे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त नागरिकांनी विद्युत अधीक्षक अभिजीत पवार यांना जाब विचारत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमबाजी केली होती. यावेळी पवार बैठकीस निघून गेल्याने आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी नमाजाची वेळ झाल्यामुळे विद्युत अधीक्षकांच्या कार्यालयातच नमाज पठण केले होते. नमाज पठणाचा हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हिंदुत्वादी संघटनांतर्फे नमाजास प्रतिउत्तर म्हणून आयुक्तांच्या दालनात हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले होते.

महानगरपालिका कार्यालयात नमाज पठण केले गेल्याच्या घटनेची गंभीर दखल भाजप नेते डॉक्टर किरीट सोमय्या यांनी घेत या घटनेचा निषेध करत शासकीय कार्यालयात नमाज पठण करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करावे तसेच महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील अधिकारी सेवकांवर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली होती.

- Advertisement -

“‘एआय’च्या युगात डेटा हीच सर्वात मोठी शक्ती”; राज ठाकरेंच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास शुभेच्छा

दरम्यान, महानगरपालिका कार्यालयात झालेल्या नमाज पठणाची गंभीर दखल आयुक्त रवींद्र जाधव यांनी घेतली होती. आयुक्तांच्या आदेशावरून विद्युत विभागाच्या सेवकाने दाखल केलेल्या फिर्यादीवरून किल्ला पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्यासह विविध कारणांवरून मनपा विद्युत अधीक्षक अभिजीत पवार यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी काढले आहे. आस्थापना विभागातर्फे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...