Sunday, May 24, 2026
HomeनगरRahata : जिल्ह्यात 27 पासून मान्सूनपूर्व पावसाचे आगमन

Rahata : जिल्ह्यात 27 पासून मान्सूनपूर्व पावसाचे आगमन

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

अहिल्यानगर जिल्ह्यात 27 ते 31 मे दरम्यान मान्सून पूर्व पावसाचे आगमन होणार आहे. तर 7 ते 10 जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असे मत जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केले. नैऋत्य मौसमी पावसासाठी अनुकुल असल्याने मान्सून केरळमध्ये तो 25 पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याची पुढील वाटचाल जलद गतीने होऊन तो 2 जूनच्या दरम्यान महाराष्ट्राच्या दक्षिण भाग तसेच कोकणात धडकेल.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्यात नियमित मान्सूनचे आगमन 7 ते 10 जूनच्या दरम्यान होईल. परंतु त्याअगोदर 26 मे पर्यंत ढगाळ हवामानात वाढ होत जाऊन हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढत जाईल. अहिल्यानगरच्या उत्तर आणि दक्षिण भागात काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन विखुरलेल्या भागात हलक्या स्वरुपात वळवाचा पाऊस पडेल. 27 ते 31 मे च्या दरम्यान बहुतांश भागात मान्सुनपूर्व म्हणजे वळवाच्या पावसाची चांगली हजेरी लागेल. अहिल्यानगर मध्ये 1 ते 6 जूनच्या दरम्यान तापमानात लक्षणीय घट होऊन नियमित मान्सूनची चाहुल लागेल. अहिल्यानगर जिल्ह्यात 10 ते 20 जूनच्या दरम्यान पेरणीयोग्य सर्वदुर पाऊस होईल. एकंदरीत यावर्षी खरीप पिकांसाठी नैऋत्य मान्सुनची परीस्थिती अनुकुल आहे, असेही श्री. निर्मळ यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आचारसंहिता लागू नसल्याने होणार कर्मचार्‍यांच्या बदल्या!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे तात्पुरत्या स्थगित केलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांना पुन्हा एकदा संमती मिळाल्याने सोमवारी (दि. 25) या बदल्या होत आहेत. दरम्यान,...