- Advertisement -
नवी दिल्ली । प्रतिनिधी New Delhi
येत्या रविवारी २८ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्रात नियोजित दौरा असणार आहे. राष्ट्रपतींचे आगमन, दौरा आणि सुरक्षा याबाबत काळजी घेतली जात आहे.
येत्या २८ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सकाळी कोल्हापूरमध्ये करवीर निवासनी अंबाबाईचे दर्शन घेतील . देवीचे दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रपती पुढे वारणेला जाणार आहेत. या ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत.
वारणा येथे नव्याने मान्यता मिळालेल्या वारणा विद्यापीठाच्या उद्दघाटनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत.