Thursday, March 13, 2025
Homeजळगाववैशालीताई सुर्यवंशी यांचा पत्रकार परिषदेत आमदारांवर हल्लाबोल

वैशालीताई सुर्यवंशी यांचा पत्रकार परिषदेत आमदारांवर हल्लाबोल

पाचोरा । प्रतिनिधी

तब्बल दोनशे कोटी रूपयांचे मूल्य असलेले पाचोर्‍यातील नऊ भुखंड कुणी लाटले? असा सवाल करत पाचोरा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रसंगी त्यांनी कामांवरून आमदार किशोर पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

वैशालीताई सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर खळबळजनक आरोप केले. त्या म्हणाल्या की, आमदार किशोर पाटील, अमोल शिंदे, दिलीप वाघ आणि अन्य उमेदवार हे शेवटच्या टप्प्यात अफवांच्या बळावर काही तरी कारस्थान करण्याची शक्यता आहे. आमदाराने आधीच वैशाली सुर्यवंशी या माझ्या नावाशी साधर्म्य असणारा उमेदवार उभा केला आहे. या उमेदवाराचा आधार घेऊन वैशालीताई सुर्यवंशी यांनी मला पाठींबा दिला अशी खोटी अफवा पसरवू शकतात. यामुळे आमचे समर्थक आणि मतदारसंघातील जनता यांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अशा प्रकारे त्यांनी बेकायदा कृत्य केल्यास मी कठोर कायदेशीर कारवाई करेल. मात्र याबाबत मतदारांनी सावध रहावे असे आवाहन वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले.

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर घणाघाती आरोप करत मैत्रेयच्या गुंतवणुकदारांना आश्वासन देऊन देखील त्यांनी वार्‍यावर सोडल्याचा आरोप केला. तर अमोल शिंदे यांच्यासह अन्य उमेदवारांनी देखील याबाबत मौन बाळगल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रसंगी त्यांनी शहरासह ग्रामीण मागातील कामांबाबत आरोपांच्या फैरी झाडल्या. पाचोरा शहरातील पाणीपुरवठा दूषित आहे. आमदारांनी मोठा गाजावाजा केलेला पाणीपुरवठा योजनेचा फिल्टर प्लांटच बंद आहे. बहुळा धरणावरून शहरासाठी मोठा निधी खर्च करून जलवाहिनी आणण्याचा गाजावाजा केला होता तो जनतेचा पैसा पूर्ण वाया गेला आहे.

भूमिगत गटारीच्या नावाने अख्खे पाचोरा शहर कोरून त्या योजनेचे तीन तेरा वाजलेत. तर आमदरांच्या पुढाकारानेच पाचोरा शहरातील सुमारे दोनशे कोटींचे मूल्य असणार्‍या नऊ भुखंडांची खिरापत वाटण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. ओपन स्पेस हे त्या भागातील जनतेच्या मालकीची असून ती ऑक्सीजन पार्क म्हणून काम करत असतात. मात्र आमदारांनी या आपल्या समर्थकांच्या माध्यमातून कोट्यवधींचा मलीदा लाटल्याचा आरोप देखील वैशालीताई सुर्यवंशी यांनी याप्रसंगी केला. दरम्यान, हे सर्व कारस्थाने होत असली तरी मतदारसंघातील जनता आपल्यालाच कौल देणार असल्याचा आशावाद याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी व्यक्त केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...