Wednesday, September 2, 2026
Homeदेश विदेशमुंबई : विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई : विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई | वृत्तसंस्था 

- Advertisement -

हजारो कोटी रुपयांना गंडा घालून परदेशात पळून जाणाऱ्या विजय मल्ल्या याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. बँकांचे थकीत येणे वसूल करण्यासाठी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश आज देण्यात आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील पीएमएलम कोर्टाकडे बँकांचे थकीत देणे देण्यासाठी संपत्ती जप्त करण्याबाबत अर्ज दाखल होते. त्यावर निर्णय देताना आज कोर्टाने माल्ल्याला जोराचा धक्का दिला.

दरम्यान, येत्या १८ जानेवारीपर्यंत आपल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 18 जानेवारीपर्यंत स्थगिती देखील दिली असून मल्ल्याकडे या निर्णयाच्या विरोधात अपील करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी मिळणार आहे. मल्ल्या यापुढे काय करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्या

Prithviraj Chavan : आरएसएस महिलेला सरसंघचालक बनवणार का? पृथ्वीराज चव्हाण यांचा...

0
नाशिक | Nashik काँग्रेसच्या (Congress) संगठन सृजन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या ७८ जिल्हा अध्यक्षांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा समारोप काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल...