Friday, April 25, 2025
HomeनगरAhilyanagar : 28 प्राथमिक आरोग्य केंद्र होणार स्मार्ट

Ahilyanagar : 28 प्राथमिक आरोग्य केंद्र होणार स्मार्ट

जिल्हा परिषद आरोग्य विभाग || लोकसहभागातील विविध योजना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात 14 तालुक्यांतून प्रत्येकी दोन याप्रमाणे 28 प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्मार्ट करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्याच्या विविध सुविधांसह येणार्‍या रुग्णांना विविध सेवा यासह विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.यासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

- Advertisement -

या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमात निवड करण्यात आलेल्या पीएससीमध्ये आरोग्य विषयक विविध सुविधांसह भौतिक साधनसामग्री उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक मनुष्यबळासह प्राथमिक केंद्रांची अद्ययावत इमारत, त्याठिकाणी चौकशी काउंटर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात परसबाग, सुशोभीकरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर सिस्टिम, आयुष हर्बल गार्डन, अद्ययावत औषध भंडार, नातेवाईकांसाठी वेटिंग रूम, हिरकणी कक्ष, सुसज्य अंतर व बाह्य रुग्ण विभाग, प्रस्तुती गृह, प्रयोग शाळा, संरक्षक भिंती, कर्मचारी निवासस्थाने, अत्याधुनिक वैद्य उपकरणे यासह आवश्यक डॉक्टर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासह लोकसहभागातून विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील काही संस्थांनी यासाठी होकार दर्शवला असून निवड करण्यात आलेल्या प्रार्थमिक आरोग्य केेंद्रात काम करणार आहेत. निवड करण्यात आलेल्या या 28 स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्राह्मणवाडा, विटा (ता. अकोले). अरणगाव, नान्नज (ता.जामखेड), राशीन, कुलधरण (ता. कर्जत), चास, वाळकी (ता. नगर), पळवे, कानूरपठार (ता. पारनेर), कोल्हार, सावळीविहीर (ता. राहता), गुहा, बारगाव नांदूर (ता.राहुरी), तळेगाव दिघे, निमगाव जाळी (ता.संगमनेर) दहिगावने, ढोरजळगाव (ता. शेवगाव), चासनळी, टाकळी ब्राह्मणगाव (ता. कोपरगाव). बेलवंडी, आढळगाव (ता. श्रीगोंदा) आणि पडेगाव व माळवडगाव (ता. श्रीरामपूर) यांचा समावेश आहे.

17 ठिकाणी सोलार कार्यान्वित
जिल्ह्यातील 17 प्राथमिक आरोग्य केंंद्रात आवश्यकतेनूसार सोलार प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहे. यासाठी लोकसहभागाचा समावेश करून घेण्यात आला आहे. यात पुढील काळात आणखी वाढ करून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...