Friday, May 15, 2026
Homeनगरप्राथमिक शिक्षकांच्या सहावा वेतन आयोगातील वेतन निश्चितीतील त्रुटी दूर

प्राथमिक शिक्षकांच्या सहावा वेतन आयोगातील वेतन निश्चितीतील त्रुटी दूर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सन 2005 मध्ये नियमित झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सहावा वेतन आयोगातील वेतन निश्चीतीतील त्रुटी शासनाकडून दूर करण्यात येऊन सन 2005 मध्ये नियमित झालेल्या शिक्षकांना मूळवेतन 11,170 ऐवजी 11,360 रुपये दि. 1 जानेवारी 2006 लागू करण्यात आले आहे, अशी माहिती आदर्श बहुजन शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय काटकर यांनी दिली.

- Advertisement -

सन 2005 मध्ये नियमित झालेल्या प्राथ.शिक्षकांची सहाव्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2006 रोजी मुळवेतन 11,170 रुपये (8370+2800) वेतननिश्चिती करण्यात आली होती. परंतु 1 जानेवारी 2006 किंवा त्यानंतर नियमित झालेल्या प्राथ. शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगानुसार त्यांचे नियमित वेतनश्रेणी दिनांकापासून मुळवेतन 11,360 रुपये (8560+2800) लागू करण्यात आले होते. सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करताना 2005 मध्ये नियमित झालेल्या प्राथ. शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी आदर्श बहुजन शिक्षक संघाकडून मागील 14 वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा चालू होता. इब्टा संघटनेच्या मागणीची दखल घेऊन शासनाने महाराष्ट्र नागरी वेतन सेवा (सुधारित वेतन) (सुधारणा) नियम 2022 निर्गमित केल्याचे आदर्श बहुजन शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर यांनी सांगितले.

आदर्श बहुजन शिक्षक संघाच्यावतीने महाराष्ट्र नागरी वेतन सेवा (सुधारित वेतन)(सुधारणा) नियम 2022 नुसार सहाव्या वेतन आयोगानुसार सन 2005 मध्ये नियमित झालेल्या शिक्षकांची सुधारित वेतन निश्चिती होणेबाबत गटशिक्षणाधिकारी श्रीम. साईलता सामलेटी यांना निवेदन देण्यात आले. संघटनेच्या मागणीची दखल घेऊन श्रीम. सामलेटी यांनी 2005 मध्ये नियमित झालेल्या शिक्षकांची सहाव्या वेतन आयोगाची सुधारित वेतन निश्चिती करून या वेतन निश्चितीची पडताळणी लेखा विभागाकडून करण्यात आली आहे. शासनाकडून सन 2005 मध्ये नियमित झालेल्या प्राथ. शिक्षकांना 14 वर्षानंतर न्याय मिळाला असून या शिक्षकांना 2006 ते 2015 या कालावधीतीतील वेतन फरकाचा लाभ होणार असल्याचे काटकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आनंद परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी खासदार आनंद परांजपे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिट्ठी देत...