Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशबांगलादेशनंतर आता या देशात राजकीय भूकंप; न्यायालयाने थेट पंतप्रधानांची केली हकालपट्टी

बांगलादेशनंतर आता या देशात राजकीय भूकंप; न्यायालयाने थेट पंतप्रधानांची केली हकालपट्टी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधान पद सोडावे लागलेले असतानाच आता थायलंडमध्येही राजकीय उलथापालथ झाली असून पंतप्रधानांची हकालपट्टी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांच्या विरोधात एक नैतिक ते प्रकरणी निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर थायलंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप आला आहे.

- Advertisement -

रिअल एस्टेट टायकून श्रेथा बीते गेल्या १६ वर्षातील थायलंडचे चौथे पंतप्रधान आहेत, ज्यांचे न्यायालयाच्या निर्णयाने पद गेले आहे. कोर्टाने म्हटले की, श्रेथा यांनी नैतिक तत्वे पूर्ण न करणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपदी नियुक्त करून संविधानाचे उल्लंघन केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाने पंतप्रधानांना हटवल्यानंतर देशात राजकीय उलथापालथ झाली असून सत्ताधारी आघाडीत फेरबदल होण्याची शक्यता वाढली आहे. सध्या थायलंडचे उपपंतप्रधान फुमथम वेचयाचाई यांच्याकडे कार्यवाहक पंतप्रधानपद जाण्याची शक्यता आहे.

मे महिन्यात पिचिट चुएनबान यांना पंतप्रधान कार्यालय मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यामुळे थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी संविधानाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यांना २००८ मध्ये न्यायालयीन कर्मचाऱ्यांना लाच देण्याच्या प्रकरणात तुरुंगवास ठोठावला होता. दरम्यान त्यांच्यावर लाच दिल्याचा आरोप सिद्ध झाला नव्हता. तरीही श्रेथा यांनी पिचिट चुएनबान यांनी कॅबिनेट पद देऊन संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला गेला. हा आरोप सत्य मानून न्यायालयाने पंतप्रधानांना पदावरून हटवले.

थायलंडच्या पंतप्रधानपदाची श्रीथा यांनी गेल्यावर्षीच सुत्रे हातात घेतली होती. एका वर्षाच्या आत श्रीथा यांना हटवण्यात आल्यामुळे नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी संसदेचे अधिवेशन बोलवावे लागणार आहे. गेल्या दोन दशकात थायलंडमध्ये सत्तापालट आणि न्यायालयाच्या निकालांमुळे अनेक सरकारे कोसळली आहे. श्रीथा यांना हटवल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

थायलंडची अर्थव्यवस्था कठीण काळातून जात असतानाच न्यायालयाने पंतप्रधानांना पदावरून हटवले आहे. कमी झालेली निर्यात, गगनाला भिडलेली महागाई यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे. बुराफा विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि कायदा विभागाचे डिप्टी डीन ओलार्न थिनबँगटियो यांनी म्हटले की, सत्ताधारी आघाडी एकजूट आहे. या निर्णयाने त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल मात्र यातून ते पार पडतील. थायलंडमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटामुळे भारतासह आशियाई देशांची चिंता वाढू शकते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या